Tuesday, May 14, 2024
घरमानिनीRecipeRecipe: मॅगी चीज पिझ्झा

Recipe: मॅगी चीज पिझ्झा

Subscribe

दोन मिनिटांत बनणाऱ्या मॅगीचे आपण विविध प्रकार बनवतो. कोणाला तडकेवाली मॅगी आवडते तर कोणाला चीझ मॅगी. मात्र आज आपण मॅगीपासून तयार केला जाणारी भन्नाट रेसिपी पाहणार आहोत. चला तर पाहूयात यासाठी लागणे साहित्य आणि कृती.


साहित्य-
200 ग्राम मॅगी नूडल्स
2 कांदे
2 टेबलस्पून मैदा
1 टीस्पून लाल तिखट
1/2 टीस्पून मीठ
2 मॅगी मसाला पॅकेट
गरजेनुसार चीज
2 टेबलस्पून तेल
आवश्यकतेनुसार पाणी

- Advertisement -

कृती-
सर्वात प्रथम मॅगी शिजवून घ्या. शिजल्यानंतर ती एका भांड्यात काढून त्यात शिजलेली मॅगी, बारीक चिरलेला कांदा, लाल तिखट, मीठ आणि मॅगी मसाला हे सर्व जिन्नस एकत्रित मिक्स करा. त्या मध्ये पाणी आणि मैदा मिक्सकरुन त्याचे मिश्रण घाला.

- Advertisement -

आता एका पॅन मध्ये तेल टाकून तयार सारण पसरून घ्या. एका बाजू ने क्रिस्पी झाले की दुसऱ्या बाजूने पण तेल लाऊन क्रिस्पी करावे. त्यावर चीज टाकून सर्व करावे.


हेही वाचा- Recipe: नाश्तासाठी बनवा शेवयांचा उपमा

- Advertisment -

Manini