Saturday, September 30, 2023
घर मानिनी Kitchen Recipe: नाश्तासाठी बनवा शेवयांचा उपमा

Recipe: नाश्तासाठी बनवा शेवयांचा उपमा

Subscribe

नाश्तासाठी आपण पोहे, शिरा, आप्पे, डोसे असे पदार्थ बनवतो. मात्र दररोज असा नाश्ता खाल्ल्यानंतर काहीतरी वेगळे खावे असे ही वाटते. तर आज आपण नाश्तासाठी झटपट बनणारा शेवयांचा उपमा याची रेसिपी पाहणार आहोत.

- Advertisement -

साहित्य-
शेवया, हिरव्या मिर्च्या, मीठ, जीर, कोथिंबीर, कढीपत्ता, तेल आणि बारीक शेव.

- Advertisement -

कृती-
प्रथम शेवया हाताने बारीक करुन थोड्या तेलावर परतून घ्या. नंतर त्यावर उकळते पाणी टाकून ते शिजवा. शिजल्यानंतर त्या एका चाळणीवर ओतून त्यावर पुन्हा थंड पाणी टाकावे. जेणेकरुन शेवया सळसळीत होतील.

जाड बुडाच्या पातेल्यात तेल घालून गॅसवर ठेवावे. तेल तापल्यानंतर त्यात जीर टाकून ते तडतडू द्यावे आणि कढीपत्ता, हिरव्या मिर्च्यांचे तुकडे घालावेत. त्यावर शेवया घालाव्यात. मीठं वरुन टाकावे आणि शेवया हलक्या हाताने परतून घ्यावे. 5-10 मिनिटं हा उपमा शिजण्यासाठी ठेवा. आता गॅस बंद करून शेवयाचा उपमा एका बाउलमध्ये काढून त्यावर चिरलेली कोथिंबीर टाका.


हेही वाचा- Noodles Recipe : मुलांसाठी बनवा ज्वारीचे पौष्टिक नूडल्स

- Advertisment -

Manini