घर उत्तर महाराष्ट्र तिसर्‍या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये खासगी वाहनांना बंदी

तिसर्‍या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये खासगी वाहनांना बंदी

Subscribe

राज्य परिवहन मंडळाच्यावतीने २५० बसेसचे नियोजन

नाशिक : श्रावणातील तिसर्‍या सोमवारला विशेष महत्व असल्याने त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच तिसर्‍या श्रावणी सोमवारी ब्रम्हगिरीला प्रदक्षिणा करणार्‍यांची गर्दीत भर पडणार असल्याने प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून २५० जादा बससेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा अधिकचा श्रावण आल्याने उत्तर भारतीयांसह देशाच्या इतर भागातून आलेल्या भाविकांनी अधिक मासात शिवदर्शनाला प्राधान्य दिले.

श्रावण महिन्यात तिसरया सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे मोठया संख्येने भाविक ब्रम्हगिरी प्रदक्षिणा करत असतात. रविवारी सायंकाळपासूनच त्र्यंबकेश्वरकडे भाविकांचे जत्थे जाण्यास सुरूवात होते. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता तिसर्‍या सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये खासगी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच देवस्थानच्या वतीने भाविकांची होणारी गर्दी पाहता गर्भगृहातील दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांना दुरूनच दर्शन घ्यावे लागणार आहे.

- Advertisement -

व्ही.आय.पी. दर्शनही बंद ठेवण्यात आले असून रांगेतील भाविकांसाठी लाडू, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांकडून जादा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून ब्रम्हगिरी प्रदक्षिणा मार्गावर धुडगूस घालणार्‍यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. नगरपालिका प्रशासनाकडून या काळात भाविकांची होणारी गर्दी पाहता फिरते शौचालय, पाणी, आरोग्य पथक आदींची व्यवस्था करण्यात येत असून खासगी वाहनांना त्र्यंबक शहर परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने मागील दोन सोमवारचा अनुभव लक्षात घेता तिसर्‍या श्रावणी सोमवारी होणार्‍या गर्दीकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वरजवळील विविध भागातून त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची ने-आण करण्यासाठी २५० जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. ३ आणि ४ सप्टेंबर रोजी या जादा बस आपली सेवा देणार आहेत. यामध्ये नाशिक ते त्र्यंबक १८०, अंबोली ते त्र्यंबक १०, पहिने ते त्र्यंबक १०, घोटी ते त्र्यंबक १० आणि खंबाळे ते त्र्यंबक ४० अशा २५० बसचे नियोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -