घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरमराठा आरक्षण : जालन्यात उपोषणकर्त्यांवर बेछूट लाठीचार्ज, पोलिसांचा दावा...

मराठा आरक्षण : जालन्यात उपोषणकर्त्यांवर बेछूट लाठीचार्ज, पोलिसांचा दावा…

Subscribe

मागील तीन दिवसांपासून उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील व त्यांच्या सहकार्‍यांना 1 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी अश्रूधूर आणि लाठीचार्ज केला.

जालना : राज्यात मागील अनेक वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीला आज जालन्यात वेगळे वळण मिळाले आहे. मागील तीन दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी बसलेल्या उपोषणकर्तांना पोलिसांनी अटक करीत उपस्थितांना पांगविण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेमुळे आता राज्यातील राजकारण पेटण्याची शक्यता असून, प्रकरणी शरद पवार यांनी बळाचा वापर करण्याची गरज नव्हती अशी प्रतिक्रिया दिली आहे.(Maratha reservation: Indiscriminate lathi charge on hunger strikers in Jalna, police claim…)

मागील तीन दिवसांपासून उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील व त्यांच्या सहकार्‍यांना 1 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी अश्रूधूर आणि लाठीचार्ज केला. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री शिंदेसोबत बोलल्यानंतरी मागणीवर ठाम

मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी शहागड येथे आंदोलन करण्यात आले होते. त्यांनतर अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसले होते. बुधवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांच्याशी संपर्क साधत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतु आरक्षणाच्या मागणीवर जरांगे ठाम होते. त्यांनी शुक्रवारपर्यंत सरकारला मुदत दिली. अखेरीस सायंकाळी अंतरवाली येथील आंदोलन मोडून काढण्याचे ठरविण्यात आले, व पोलिसांनी बळाचा वापर केला.

हेही वाचा : ‘INDIA’ आघाडीच्या लोगोचं का झालं नाही अनावरण? उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण…

- Advertisement -

आंदोलकांनी दगडफेक केल्याचा आरोप

उपोषणकर्त्यांवर लाठीचार्ज करावा लागला कारण, पोलिसांवर आंदोलनकर्त्यांनी आधी दगडफेक केल्याने पोलिसांना आंदोलकांवर लाठीचार्ज करावा लागला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दगडफेकीत एक पोलिस जखमी झाला आहे. पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे वातावरण तणावपूर्वक बनले. सरकारने परिस्थिती शांतपणे हाताळावी, असे आवाहन करत पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठी हल्ल्याचा विनोद पाटील यांनी निषेध व्यक्त केला आहे.

हेही वाचा : भाजपची जी स्थिती कर्नाटकात झाली तीच महाराष्ट्रातही होणार-राहुल गांधी

शरद पवारांकडून निषेध

उपोषणकर्त्यांनी मागणीचा आग्रह धरला म्हणून सत्ताधाऱ्यांनी बळाचा वापर करून लाठीचार्ज केला. यावेळी पोलिसांनाही वरिष्ठांकडून लाठीचार्ज करण्याचे आदेश देण्यात आले असल्यामुळे तेही हतलब असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर ही गृहखात्याची अतिरेकी भूमिका आहे. मी या घटनेचा निषेध करतो असे अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

जालन्यात तणावपूर्ण शांतता

पोलीस आणि आंदोलक होत असलेल्या चर्चेदरम्यान हा प्रकार घडला. यावेळी पोलीस विरुद्ध आंदोलक अशी स्थिती निर्माण झाली होती. यावेळी अश्रुधारेचा वापरही केला. तर आता वाहनांची जाळपोळ करण्यात आली असून, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रण जरी मिळवले तरी सध्या येथे तणावपूर्ण शांतता आहे.

मराठा समाजावर क्रूरपणे लाठीमार – वडेट्टीवार

जालन्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी लाठीमार केला आहे. मराठा समाजाची फसवणूक करुन सत्तेत आलेल्यांनी आता त्याच मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्यांवर लाठीमार केला आहे. मराठा समाजाने आता या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -