Friday, May 17, 2024
घरमानिनीRecipeRecipe: घरच्या घरी बनवा असा टोमॅटो सालसा

Recipe: घरच्या घरी बनवा असा टोमॅटो सालसा

Subscribe

टोमॅटो सालसा हा नाचोस सोबत खाल्ल्या जाणाऱ्या डीप प्रमाणे बनवणे सोपे असते. कापलेले टोमॅटो, कांदा, हर्ब्स आणि मसाल्यांचा वापर करावा लागेल. तुम्ही नाचोस आणि टोर्टिलाचा अधिक चविष्ट बनवण्यासाठी टोमॅटो सालसा डीप घरच्या घरी तयार करू शकता.


साहित्य-
2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरलेले
1/4 कप बारीक चिरलेली कोथिंबीर
1/4 कप चौकोनी कापलेली कांदे
1 हिरवी मिर्ची
1 लसूण पाकळी
1/4 टीप्सून जीऱ्याची पावडर
चिमूटभर साखर (ऑप्शनल)
मीठ चवीनुसार
1 टेबलस्पून लिंबूचा रस

- Advertisement -

कृती-
बारीक चिरलेले टोमॅटो एका बाउलमध्ये घ्या. (जर तुम्हाला घट्ट सालसा आवडत असेल तर कापलेल्या टोमॅटोच्या बिया आणि त्याचा रस काढा.) आता त्यात कापलेले कांदे, कोथिंबीर आणि लसूण मिक्स करा.

- Advertisement -

आता हे सर्व एकत्रित करून मिक्सरमध्ये वाटून घ्या. वाटलेले मिश्रण एका बाऊलमध्ये काढून त्यात लिंबाचा रस, मीठ चवीनुसार आणि साखर मिक्स करा. शेवटी वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाका.


हेही वाचा- Recipe : नाश्त्यामध्ये बनवा वाटाणा-पोह्याचे कटलेट

- Advertisment -

Manini