सकाळी नाश्ताला काय बनवायचं असा प्रश्न महिलांना कायम पडत असतो. यामुळे आज आम्ही तुम्हाला हिरवा वाटाणा आणि पोह्याचे कटलेट्सची रेसिपी देत आहोत. पोहे आणि वाटाणा दोन्ही तब्येतीसाठी फायदेशीर आहे. यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा.
साहित्य :
- 1 कप पोहे (भिजवलेले)
- पाव कप उकडलेला हिरवा वाटाणा
- 2 उकडून कुस्करलेले बटाटे
- 1 कांदा बारीक चिरलेला
- 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
- 1/2 चमचा लाल मिरची पावडर
- 1/2 चमचा गरम मसाला पावडर
- 1/2 चमचा काळी मिरी पावडर
- 1 चमचा जिरे आणि चाट मसाला
- 1 चमचा बारीक चिरलेली मिरची
- 1 चमचा गाजराचा किस
- 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर
- तळण्यासाठी तेल
- चवीसाठी मीठ
कृती :
-
सर्वात आधी भिजवलेले पोहे हाताने कुस्करुन घ्या.
-
त्यात हिरवा वाटाणा, कांदा, कोथिंबीर, गरम मसाला पावडर, काळी मिरी पावडर, जीरे आणि चाट मसाला, गाजर, आणि इतर साहीत्य टाकून सर्व जिन्नस एकजीव करा.
-
हाथावर तेल लावत कटलेट थापा.
-
कढाईत किंवा फ्राय पॅनमध्ये तेल टाकून लालसर तळा.
-
हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर कटलेट छान लागतात.
हेही वाचा : Recipe : चमचमीत ढोबळी मिरचीचं रायतं
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -