घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरपुन्हा मागितली एका महिन्याची मुदत; सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला

पुन्हा मागितली एका महिन्याची मुदत; सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला

Subscribe

गिरिश महाजन हे औरंगाबाद विमानतळावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांच्याकडे पुन्हा एकदा एका महिन्याची वेळ मागितली आहे. तसंच, यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांच्यावरही टीकास्त्र डागलं आहे.

जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी, आज, सोमवारी सरकारचं एक शिष्टमंडळ सराटी गावात दाखल झालं आहे. सरकारने धाडलेल्या या शिष्टमंडळात मंत्री संदिपान भुमरे, आरोग्यमंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांचा समावेश आहे. या गावात जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्यासह उपोषणकर्त्यांची भेट घेतली जाणार आहे. गिरिश महाजन हे औरंगाबाद विमानतळावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांच्याकडे पुन्हा एकदा एका महिन्याची वेळ मागितली आहे. तसंच, यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांच्यावरही टीकास्त्र डागलं आहे. (Aurangabad Jalna Maratha Protest Maharashtra government delegation arrived at aurangabad Airport will dialogue with Manoj Jarange Patil )

मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे. आरक्षण मिळावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मात्र हा विषय टेक्निकल विषय आहे. त्यामुळे त्याचा अध्यादेश असा काढता येत नाही. त्याला वेळ लागतो. त्यामुळे जरांगे पाटील यांनी एक महिन्याचा वेळ द्यावा, अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली आहे. तसंच, आम्ही जरांगे यांना विनंती करायला जात आहोत की त्यांनी उपोषण मागे घ्यावं, कारण त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी तिथे जात असल्याची गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: उदयनिधी स्टॅलिनचा शिरच्छेद करणाऱ्याला 10 कोटी रुपये, अयोध्येतील पुजाऱ्याची घोषणा )

गिरीश महाजन म्हणाले की, मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप जूना आहे. अनेक वर्षांपासूनची ती मागणी आहे. कधीपासून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसंच, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही आरक्षणासाठी खूप कसरत करावी लागली होती. हे आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी टिकवलंही होतं मात्र जेव्हा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं तेव्हा राज्यात ठाकरे सरकार होत आणि त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ते आरक्षण नामंजुर करण्यात आलं हे सुर्यप्रकाशाइतकं सत्य आहे, असं म्हणत त्यांनी मराठा आरक्षणाचं खापर मविआ सरकारवर फोडलं आहे.

- Advertisement -

खडसेंनी स्वत:चे हाल पाहावेत

एकनाथ खडसे यांनी मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला होता. याला प्रत्युत्तर देताना गिरिश महाजन संतापले. त्यांनी खडसेंना स्वत:चे काय हाल झाले ते बघा आधी, असं म्हटलं. काय होता आणि आता काय झालात यावर लक्ष द्या, असं म्हणत त्यांना सल्ला दिला आहे. भाजपमध्ये 35 वर्षे राहून 10-10 मंत्रीपदं घेतली तेव्हा काही वाटलं नाही का? तुमची मस्ती सगळ्यांनी पाहिली, सर्व बिल्डर्सनी पाहिली आहेत. तुम्ही जे धंदे केले त्याची फळं आता तुम्ही भोगत आहात, असंही महाजन म्हणाले. लोकांनी तुम्हाला विधानसभेत पाडलं आणि दुधडेरीतून हाकलून दिलं, असं म्हणत महाजन यांनी खडसेंवर टीका केली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -