Sunday, May 19, 2024
घरमानिनीRecipeRecipe : मुलांसाठी बनवा रताळ्याची पौष्टिक कचोरी

Recipe : मुलांसाठी बनवा रताळ्याची पौष्टिक कचोरी

Subscribe

आत्तापर्यंत तुम्ही कचोरी खाण्यासाठी मैद्याचा वापर केला असेल. मात्र, आज आम्ही तुम्हाला चविष्ट आणि पौष्टिक अशा रताळ्यांपासून कचोरी कशी बनवायची हे सांगणार आहोत.

साहित्य :

  • 250 ग्रॅम रताळी
  • 1 वाटी खवलेले खोबरं
  • 1 बटाटा
  • 4-5 हिरव्या मिरच्या
  • 50 ग्रॅम शेंगदाणे
  • 2 वाटी तांदळाचे पीठ
  • मीठ चवीनुसार
  • साखर
  • तूप आवश्यकतेनुसार

कृती :

Upvas Kachori recipe in Marathi- उपवासाची पनीर कचोरी- Navratri fasting recipes- Kali Mirch by Smita - Kali Mirch - by Smita

- Advertisement -

 

  • सर्वात आधी रताळे आणि बटाटे उकडून घ्यावे.
  • त्यानंतर उकडलेली रताळी आणि बटाट्यांची सालं काढून ते हाताने कुस्करून बारीक करावे आणि त्यामध्ये थोडे मीठ घालावे.
  • 1 ते 2 चमचा तेलात मिरच्या परतून घ्याव्या. त्यानंतर हे गॅसवरून खाली उतरवून त्यामध्ये खोबरे, शेंगदाणे साखर घालुन सारण करावे.
  • आता रताळे आणि बटाट्याची पारी करून त्यात थोडे सारण घालून कचोऱ्या कराव्यात. नंतर तांदळाच्या पिठात घोळवून तुपात तळावे.
  • तयार रताळ्याची कचोरी सर्व्ह करा.

हेही वाचा : Recipe: नाश्तासाठी बनवा शेवयांचा उपमा

- Advertisment -

Manini