Thursday, May 2, 2024
घरमानिनीKitchenRecipe : टेस्टी मटण दम बिर्याणी

Recipe : टेस्टी मटण दम बिर्याणी

Subscribe

चिकन बिर्याणी, व्हेज बिर्याणी आपण नेहमीच आवडीने खातो. पण आज आम्ही मटण बिर्याणी कशी बनवायची हे सांगणार आहोत.

साहित्य : 

  • 1/2 किलो मटण
  • 3 वाट्या बासमती तांदूळ
  • आलं-लसूण पेस्ट
  • मिरची
  • कोथिंबीर
  • 2 कांदे
  • 2 टोमॅटो
  • दही
  • लिंबू
  • तिखट
  • मीठ
  • हळद
  • बिर्याणी मसाला

कृती : 

Mutton Dum Biryani

- Advertisement -
  • सर्वप्रथम मटण धुऊन त्याला आलं, लसूण, मिरची, कोथिंबिरीची जाडसर पेस्ट लावून त्यातच दही, लिंबू, बारीक चिरलेले टोमॅटो, तिखट, मीठ, हळद, बिर्याणी मसाला घालून एक तासभर ठेवावे.
  • हे सगळे मिश्रण मुद्दाम डायरेक्ट कुकरमध्येच ठेवून द्यावे, कारण बिर्याणी कुकरमध्येच करायची आहे.
  • तांदूळ धुऊन पंधरा मिनिट निथळत ठेवावे. त्यानंतर एका वेगळ्या पातेल्यात तांदूळ जेमतेम बुडतील एवढे पाणी घालून थोडा मोकळा भात शिजवून घ्यावा.
  • कांदे उभे चिरून कढईत थोडे जास्त तेल घालून ब्राऊन रंगावर तळून घ्यावे. मग ते बाजूला एका पेपरवर काढून घ्यावे.
  • त्याच तेलात हिंग, जिरे, लसूण (बारीक चिरलेली), हळद याची फोडणी करावी. ही फोडणी कुकरमध्ये ठेवलेल्या मिश्रणाला द्यावी.
  • त्यानंतर त्यावर तळलेला कांदा पसरवून घ्यावा. त्याच्यावर मोकळा शिजवलेला भात पसरवून घ्यावा.
  • यानंतर कुकरची शिट्टी काढून त्या ठिकाणी मळलेल्या कणकेचा गोळा लावून घ्यावा. झाकणालाही गोल कणीक लावून घ्यावी. कुकर मोठ्या गॅसवर ठेवावा.
  • त्याचबरोबर दुसर्‍या शेगडीवर तवाही तापत ठेवावा. कुकर पंधरा-वीस मिनिटे गॅसवर ठेवल्यानंतर वाफ कणीक फोडून आपसूकच बाहेर येऊ लागते.
  • ही वाफ बाहेर यायला लागली की कुकर गॅसवरून उतरून तापत असलेल्या तव्यावर ठेवावा. यानंतर गॅस बारीक करून अर्धा तास शिजू द्यावे.
  • अर्ध्या तासाने गॅस बंद केल्यावरही पाच ते दहा मिनिटं वाफ मुरू द्यावी. यानंतर कुकर उघडून बिर्याणीचे लेअर्स तांदूळ न तोडता हलक्या हाताने ढवळून घ्यावेत.

हेही वाचा :

Recipe : टेस्टी अंडा नूडल्स

- Advertisment -

Manini