घरमहाराष्ट्रUddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरेंना शब्द दिला ठाकरेंचं वाईट करणार नाही; कोण...

Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरेंना शब्द दिला ठाकरेंचं वाईट करणार नाही; कोण आणि का म्हणालं हे

Subscribe

मुंबई – भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय लघु, मध्यम आणि सुक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांना शब्द दिला आहे. कोणत्याही ठाकरेंच वाईट करणार नाही, म्हणून शांत बसलो आहे. असं सांगत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

इंडिया आघाडीच्या दिल्लीतील रामलीला मैदानावरील सभेला शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हजर होते. त्यांच्या उपस्थितीचा समाचार घेत नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षांत फक्त दोन दिवस मंत्रालयात गेले होते. आता मात्र ते दिल्लीत जात आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या सभेतून अब की बार भाजप तडीपार अशी घोषणा दिली आहे. त्यावरुनही नारायण राणे यांनी ठाकरेंवर टीका केली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे स्वतःला काय समजतात माहिती नाही? उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती बिघडलेली आहे. पंतप्रधानांवर बोलण्याऐवढी त्यांची लायकी, पात्रता आणि गुणवत्तापण नाही. असे लोक आता तडीपारची भाषा करत आहेत. आमचा पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे, असं नारायण राणे म्हणाले.

हेही वाचा : Modi Vs Thackeray : आता ठाकरे गॅरंटी! जुमलेबाज विरुद्ध कुटुंबप्रमुख; शिवसेना ठाकरे गटाच्या ट्वीटची चर्चा

- Advertisement -

नारायण राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर वैयक्तिक हल्ला केला आहे. ते म्हणाले की चाळीस वर्षे मी शिवसेनेत होतो. आम्ही मातोश्रीवर कधीही खाली हाताने गेलो नाही. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा व्यवसाय काय आहे, असा सवाल केला. ठाकरे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन सामना वृत्तपत्र आहे. कोरोना काळात सगळे पेपर बंद पडायला आले, मात्र या पेपरला नफा कसा झाला, असा सवाल नारायण राणे यांनी केला.

हेही वाचा : Shivsena : मुख्यमंत्र्यांनी आता शेतीची अवजारे तयार ठेवावी; ठाकरे गटाचे एकनाथ शिंदेंना टोले आणि चिमटे

उद्यापासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या दौऱ्यावर 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. वास्तविक हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला मिळाला पाहिजे अशी शिवसेनेच्या नेत्यांची मागणी आहे. नारायण राणे राज्यसभेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांना पुन्हा संधी देण्यात आली नाही. लोकसभा निवडणुकीत त्यांना रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून तिकीट दिले जाईल असे आश्वासन दिल्याचे बोलले जाते, मात्र अद्यापही या जागेवरील उमेदवार घोषित झालेला नाही. राणे उद्यापासून मतदारसंघाच्या दौऱ्यावर असणार आहेत, तेव्हा शिवसेना शिंदे गटाचे नेते त्यांचे कसे स्वागत करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा : Lok Sabha 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपाकडेच; नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -