लाल तिखटाचा अतिवापर ठरू शकतो घातक

लाल तिखटाचा अतिवापर ठरू शकतो घातक

भारतात मसाल्यांचा सर्वाधिक वापर केला जातो. येथील कुठलाच पदार्थ मसाल्यांशिवाय अपूर्ण आहे. मात्र, मसाल्यांचा अतिवापर देखील शरीरासाठी घातक ठरु शकतो. लाल तिखटाचा अन्नात अनेकजण भरपूर वापर करतात मात्र, याचा जास्त वापर आरोग्यासाठी हानिकारक आहे.

लाल तिखटाचा जास्त वापर ठरु शकतो घातक

लाल मिरचीचा वापर भारतात मोठ्या प्रमाणात केला जातो. कोणत्याही पदार्थामध्ये लाल तिखट टाकल्याशिवाय त्याला चव लागत नाही. पण कोणत्याही गोष्टीचा अतिवापर शरीरासाठी घातक असतो.

लाल मिरचीमुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे पोटात अ‍ॅसिडिटी होऊ शकते, तसेच छातीत जळजळ होण्याची समस्या देखील उद्भवू शकते.

जास्त प्रमाणात लाल तिखट खाल्ल्याने पोटात अल्सर होण्याची भीती नेहमीच असते. त्यामुळे डॉक्टर नेहमी कमी तिखट खाण्याचा सल्ला देतात. कारण, त्याचे कण पोट आणि आतड्याला चिकटून अल्सर होतात.

लाल मिरचीचा जास्त वापर केल्याने अनेकदा जुलाबाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ती मर्यादित प्रमाणात खावी.

जास्त तिखट खालल्याने रक्तदाब वाढतो. त्याचे दुष्परिणाम तुमच्या मनावर आणि मेंदूवरही पडणे स्वाभाविक आहे. परिणामी, राग आणि चिडचिड या समस्येचा सामना करावा लागू शकतो.

जास्त तिखट खाल्ल्याने छाती आणि पोटात जळजळ होते. यामुळे मळमळ, अस्वस्थतेची समस्या जाणवू लागते. त्यामुळे निद्रानाशाची समस्याही उद्भवू शकते.


हेही वाचा :

हृदय, डोळे आणि हाडं मजबूत करण्यासाठी फरसबी आहे फायदेशीर

First Published on: October 2, 2023 1:00 PM
Exit mobile version