Saturday, May 18, 2024
घरमानिनीHealthचालल्यानंतर हात-पाय सूजत असतील तर 'हा' असू शकतो आजार

चालल्यानंतर हात-पाय सूजत असतील तर ‘हा’ असू शकतो आजार

Subscribe

वय वाढण्यासह आजारपण मागे लागते. एका आजारामागून एक आजार होण्यास सुरुवात होते. त्यापैकीच एक म्हणजे हात-पाय सुजणे. परंतु याचे संकेत ओळखणे अत्यंत गरजेचे आहे. यावर वेळीच उपचार केला नाही तर गंभीर समस्या उद्भवू शकते. काही वेळेस असे होते की, थोडावेळ जरी वेगाने चाललो तरीही हात- पाय दुखणे किंवा सूज येण्याची समस्या होते. यामागे काही कारणे असू शकतात. मात्र हे एक गंभीर आजाराचे संकेत असू शकतात.

रुमेटाइड अर्थराइटिस हा एक ऑटो इम्युन आजार आहे. आपली रोगप्रतिकारक शक्ती एखाद्या आजारापासून आपल्याला दूर ठेवते. मात्र ऑटो इम्युन आपल्या इम्युन सिस्टिममधील हेल्दी सेल्सला नुकसान पोहचवतात. जगभरात अर्थराइटिसच्या समस्येने महिला त्रस्त आहेत. हात, पाय, मनगट , टाचा आणि गुडघे आणि खांदे यांना सूज येणे ही याची सुरुवातीची लक्षणे आहेत. रुमेटाइड अर्थराइटिस डोळे, फुफ्फुसे आणि त्वचेवर खुप परिणाम करतात.

- Advertisement -

Details You Need To Know About Rheumatoid Arthritis - Cura4U

रुमेटाइड अर्थराइटिसची लक्षणे
-या आजारात सर्वाधिक सांधे दुखतात.
-रुमेटाइड अर्थराइिटस मध्ये तुमचे मनगट, पाय आणि सांधे दुखतात.
-हा आजार हातापायांना सूज, खांद्याच्या स्नायूंपर्यंत पोहचला जातो.
-जर हा आजार अधिक वाढला गेला तर हाताने लिहिणे, एखादी गोष्ट पकडणे, चालणे किंवा पायऱ्यांवरून उतरण्यास ही समस्या येऊ शकते.
-या आजारामुळे रुग्णाला अधिक थकवा, झोप न येणे, भूक न लागणे, ताप अशी समस्या होऊ शकते.

- Advertisement -

-असा करा बचाव
या आजारावर काही प्रकारे उपचार केला जाऊ शकतो. तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे लागते. काही खास सवयींचा लाइफस्टाइलमध्ये समावेश केला पाहिजे. या व्यतिरिक्त डाएटमध्ये फॅटी अॅसिडयुक्त पदार्थांचा समावेश करावा. व्हिटॅमिन सी युक्त फळ आणि भाज्या खा. त्यामुळे सूज येण्याची समस्या कमी होऊ शकते. तूपाचे सेवन करुन तुम्ही तुमच्या शरीरातील हाडांना बळकटी देऊ शकता. त्याचसोबत दररोज एक्सरसाइजही जरुर करावी.


हेही वाचा- शरीरात मॅग्नेशिअमचा स्तर कमी झाल्यास दिसतात ‘हे’ संकेत

- Advertisment -

Manini