घरदेश-विदेशपीयूष गोयलांचा शरद पवारांवर पलटवार; म्हणाले, बाटला हाऊस चकमकीवरून अश्रू ढाळणाऱ्यांचा...

पीयूष गोयलांचा शरद पवारांवर पलटवार; म्हणाले, बाटला हाऊस चकमकीवरून अश्रू ढाळणाऱ्यांचा…

Subscribe

इस्रायल आणि पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमास यांच्यातील युद्धाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी जोरदार प्रहार केला आहे.

मुंबई: इस्रायल आणि पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमास यांच्यातील युद्धाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी जोरदार प्रहार केला आहे. माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टिप्पणीवर गोयल म्हणाले की, त्यांनी आधी देशाचा विचार केला पाहिजे. (Politics Piyush Goyal hits back on Sharad Pawar Said those who shed tears from the Batla House encounter)

भाजपचे ज्येष्ठ नेते पीयूष गोयल यांनी सोशल मीडिया X वर लिहिले की, “शरद पवार यांच्यासारखे ज्येष्ठ नेते इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्याबाबत भारताच्या भूमिकेबाबत बेताल वक्तव्ये करतात हे अतिशय अस्वस्थ करणारे आहे. जगाच्या कोणत्याही भागात असलेल्या दहशतवादाचा निषेध केला पाहिजे. देशाचे संरक्षणमंत्री आणि अनेकवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीचा (शरद पवार) दहशतवादाशी निगडित विषयात असा बेजबाबदार दृष्टिकोन आहे, ही खेदाची गोष्ट आहे.

- Advertisement -

ते म्हणाले की, शरद पवार हे बाटला हाऊस चकमकीत अश्रू ढाळणाऱ्या सरकारचा भाग होते. भारतीय भूमीवर हा जो हल्ला झाला त्यावेळी हे झोपून राहिले. ही कुजलेली मानसिकता थांबवायला हवी. मला आशा आहे की, शरद पवार आता तरी देशाचा विचार करतील.

काय म्हणाले शरद पवार?

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी अलीकडेच मुंबईतील प्रदेश कार्यालयात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शवला. ते म्हणाले, “इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध जागतिक शांततेला धोका आहे. तेथील जमीन आणि घरे पॅलेस्टाईनची होती. इस्रायलने ते ताब्यात घेतले.

- Advertisement -

पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत ते म्हणाले, “देशाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका पॅलेस्टाईनला मदत करण्याची होती. विद्यमान पंतप्रधान (पीएम मोदी) यांनी दुर्दैवाने इस्रायलला पाठिंबा दिला आहे. परंतु आपण जो खरा मालक आहे त्याच्या आणि कष्टकरी जनतेच्या बाजूने असल्याचे पवार म्हणाले.

काय म्हणाले होते पीएम मोदी?

हमासने 7 ऑक्टोबरला सकाळी इस्रायलवर हल्ला केला. यानंतर पीएम मोदींनी सोशल मीडियावर याचा निषेध करत हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर बोलताना ते म्हणाले की, भारत तुमच्या पाठीशी एकजुटीने उभा आहे.

(हेही वाचा: विजय मल्ल्याचे ब्रिटनमधून प्रत्यार्पण झालेच, मोदी सरकारने… ठाकरे गटाची कोपरखळी )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -