घरमनोरंजन'सिंघम 3'मध्ये झाली टायगर श्रॉफची एन्ट्री

‘सिंघम 3’मध्ये झाली टायगर श्रॉफची एन्ट्री

Subscribe

मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या ‘सिंघम 3’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या आणि दुसऱ्या पार्टला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. सध्या सतत या चित्रपटाबद्दल नवनवीन अपडेट समोर येत असतात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील दीपिका पादुकोणचा पहिला पोस्टर समोर आला होता. दरम्यान, आता या चित्रपटामध्ये अभिनेता टायगर श्रॉफची देखील एन्ट्री झाली आहे. नुकताच टायगरने चित्रपटातील एक फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

टायगर श्रॉफ दिसणार ‘सिंघम 3’मध्ये

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

बॉलिवूडचा प्रसिद्द दिग्दर्शक रोहित शेट्टीने नुकत्याच काही दिवसांपूर्वी ‘सिंघम 3’ची घोषणा केली होती. तेव्हापासून हा चित्रपट सतत चर्चेत आहे. शिवाय या चित्रपटामध्ये अनेक दिग्गज कलाकार देखील दिसणार आहेत. त्यामुळे चाहते चित्रपटाची अधिक आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, नुकतीच टायगर श्रॉफने एक पोस्ट शेअर केली ज्यातून तो देखील ‘सिंघम 3’मध्ये दिसणार असल्याचं स्पष्ट झालंय.

- Advertisement -

ही पोस्ट शेअर करत टायगरने लिहिलंय की, “ड्यूटीवर एसीपी सत्या रिपोर्टिंग सिंघम सर” टायगर देखील या चित्रपटामध्ये दिसणार असल्याचे चाहते अधिक खूश झाले आहेत.

टायगरचा ‘गणपत’ चित्रपट या दिवशी होणार प्रदर्शित

टायगर येत्या काही दिवसात त्याच्या गणपत चित्रपटामध्ये दिसेल. हा चित्रपट 20 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होईल. या चित्रपटात टायगरसोबत कृती सेनन आणि अमिताभ बच्चन देखील मुख्य भूमिकेत दिसतील. तसेच आगामी ‘सिंघम 3’ 2024 मध्ये प्रदर्शित होईल.

- Advertisement -

 


हेही वाचा : Photo : नेहा धुपियाचा देसी बोल्ड लूक पाहिलात का?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -