Wednesday, May 15, 2024
घरमानिनीScreen Time सुद्धा ठरतेय अर्ली प्युबरटीचे कारण

Screen Time सुद्धा ठरतेय अर्ली प्युबरटीचे कारण

Subscribe

सध्याच्या अल्पवयीन मुलींना सुद्धा मासिक पाळी येणे सुरु झाले आहे. यापूर्वी १४-१६ वर्षादरम्यान मासिक पाळी यायची. परंतु आता ती ९-१२ वर्षातच सुरु होते. त्याचसोबत अन्य काही समस्या होण्याची अधिक शक्यता असते. तज्ञ असे सांगतात की, यामागे काही कारणे असू शकतात. तर जाणून घेऊयात मुलींना लवकर मासिक पाळी का येते आणि यामुळे कोणत्या समस्यांचा त्यांना सामना करावा लागतो त्याबद्दल अधिक.

पहिल्यांदा मासिक पाळी सुरु होते त्या स्थितीला ‘मेनार्चे’ असे म्हटले जाते. मासिक पाळी सर्वसामान्यपणे १०-१६ वर्षादरम्यान येते. सध्या मेनार्चे हे १२.४ वर्षात येते. हे खरं आहे की, जेनेटिक कारणांमुळे ही आधीच किंवा नंतर येऊ शकतात. जर मुलीची आई किंवा आजी यांना कमी वयात मासिक पाळी सुरु झाली असेल तर त्यांच्यासोबत सुद्धा असे होऊ शकते. परंतु सध्या यामागील कारणे वेगळी आहेत.

- Advertisement -

-स्क्रिन टाइम अधिक असणे
जर कमी वयात मुलगा किंवा मुलगी मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉपची स्क्रिन पाहत असतील तर मेलाटोनिन रिलिज होण्यास काही तासांचा अवधी लागू शततो. यामध्ये बॉडी क्लॉकवर परिणाम होतो. ते डीसिंक्रनाइज होऊ शकते. जेव्हा एकदा का त्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यास तर अनहेल्थी रिअॅक्शन्स होऊ लागतात. यामध्ये हार्मोनमध्ये असंतुलन आणि डोक्याला सूज येणे हे प्रमुख आहे. दुसऱ्या बाजूला टॅबलेट आणि स्मार्टफोनचा नियमित वापरामुळे निळ्या रंगाच्या संपर्कात अधिक आपण येतो. यामुळे हार्मोनचा स्तर बदलू शकतो. अशातच वेळे आधीच प्युबर्टी एज होण्याचा धोका वाढला जातो.

- Advertisement -

-शरिराची हालचाल कमी होणे
हे सुद्धा खुप वेळ स्क्रिन टाइम पाहण्यासंबंधित आहे. स्क्रिन टाइम अधिक असल्याने मुलांच्या शरिराची हालचाल कमी होते. तीव्र शारीरिक प्रशिक्षण आणि नकारात्मक ऊर्जा संतुलन प्युबर्टी हाइपोथॅलेमिक पिट्युटरी सेट बिंदुला बदलतात. ते प्री ब्यूबर्टल टप्प्याला अधिक खेचतात. यामुळे तरुणाव्यस्थेच्या विकास आणि मेनार्चेसाठी वेळ लागतो.

-फास्ट फूड आणि प्रोसेस्ड फूडचे अधिक सेवन
कमी पोषण तत्व असणारा आहार घेतल्याने मुल अर्ली प्युबर्टी एजमध्ये प्रवेश करतात. प्रोसेस्ड फूड आणि फास्ट फूडयुक्त आहार सामान्य शारिरीक विकास थांबवतात.

-लठ्ठपणा
लठ्ठपणामुळे ग्रस्त असलेली मुलांमध्ये अत्याधिक लेप्टिनचे सीक्रेशन आणि सेक्स हार्मोनच्या स्तरात वाढ होते. यामुळे प्युबर्टल डेवलपमेंट लवकर होऊ शकते.

 


हेही वाचा: प्रेग्नेंसी दरम्यान महिलांनी ब्रेस्टफिडिंग करावे का?

- Advertisment -

Manini