घरताज्या घडामोडीयोगींसारखं दुसरं कुणीच नाही... असदच्या एन्काऊंटरनंतर कंगनाची प्रतिक्रिया

योगींसारखं दुसरं कुणीच नाही… असदच्या एन्काऊंटरनंतर कंगनाची प्रतिक्रिया

Subscribe

कुख्यात गँगस्टर अतीम अहमदचा मुलगा असद अहमदचा एन्काऊंटर झाल्यानंतर बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावतने प्रतिक्रिया देत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतूक केलं आहे. तिने नेहमीप्रमाणे तिच्या हटक्या अंदाजात योगी आदित्यनाथ यांचं कौतूक केलं आहे. तिची पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

उमेश पाल हत्याकांड प्रकरणातील आरोपी अतीक अहमदचा मुलगा असद अहमद याचा युपी एसटीएफकडून एन्काऊंटर करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे असदचा मित्र गुलाम हा देखील मारला गेला आहे. विरोधी पक्षानं या एन्काऊंटरला खोटं असं म्हटलं असून अनेक लोकांनी पोलिसांच्या या कारवाईचे कौतूक केले आहे.

- Advertisement -

अतीकच्या एन्काऊंटरनंतर कंगनाने एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये तिने इन्स्टावरून स्टोरी शेअर केली आहे. माझे बंधू योगी आदित्यनाथ यांच्यासारखे दुसरे कुणीच नाही, असं लिहित तिनं भलीमोठी पोस्ट शेयर केली आहे. तुम्हाला आता गँगस्टर म्हणजे काय कळाले असेल, योगी आदित्यनाथ यांच्या भूमिकेमुळे गँगस्टरचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे, अशा शब्दांत कंगनानं पोस्ट शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

- Advertisement -


हेही वाचा : जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये शाहरुखसह एसएस राजामौलींच्या नावाचाही समावेश


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -