Tuesday, May 7, 2024
घरमानिनीKitchenShravan Recipe : उपवासात खा पौष्टिक मखाना बर्फी

Shravan Recipe : उपवासात खा पौष्टिक मखाना बर्फी

Subscribe

श्रावणात अनेकजण उपवास करतात. मात्र प्रत्येकवेळी उपवासात तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो. अशावेळी शरीरासाठी पौष्टिक आणि चविष्ट अशी खीर तुम्ही नक्की बनवू शकता. आत्तापर्यंत तुम्ही उपवासात नारळाची बर्फी खाल्ली असेल. मात्र, यावेळी तुम्ही मखान्यांपासून बनवलेली बर्फी नक्की ट्राय करा.

साहित्य :

  • 100 ग्रॅम मखाने
  • 1 वाटी नारळ पावडर
  • 1 वाटी शेंगदाणे
  • 1 पाकिट दूध पावडर
  • 300 ग्रॅम दूध
  • 1/2 वाटी साखर
  • 5-6 वेलची

कृती :

Makhana Peanut Coconut Barfi – Tanu's Kitchen

- Advertisement -
  • सर्वप्रथम बर्फी बनवण्यासाठी मखाने नॉन-स्टिक पॅनमध्ये भाजून घ्या.
  • त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे घालून साधारण 4-5 मिनिट परता.
  • आता हे मिश्रण मिक्सरमध्ये टाकून बारीक करा.
  • दुसरीकडे एका भांड्यात दूध गरम करा आणि त्यात साखर टाका.
  • दूधाला उकळी आल्यावर त्यामध्ये मखान्याचे मिश्रण टाका सोबतच त्यात मिल्क पावडर देखील मिक्स करा.
  • आता हे सर्व मिश्रण एकसारखे ढवळा.
  • मिश्रम घट्ट झाल्यावर एका प्लेटमध्ये काढा आणि सेट करण्यासाठी ठेवा.
  • हे मिश्रण काही वेळाने गोठल्यासारखे होईल तेव्हा त्याने बर्फी प्रमाणे बारीक काप करून घ्या.

हेही वाचा :

Shravan Recipe : पौष्टिक ‘मखाना खीर’ खाऊन उपवासातील थकवा करा दूर

- Advertisment -

Manini