Monday, April 29, 2024
घरमानिनीWooden Furniture polishing : वूडन फर्निचर चमकविण्यासाठी सोप्या टिप्स

Wooden Furniture polishing : वूडन फर्निचर चमकविण्यासाठी सोप्या टिप्स

Subscribe

वूडन फर्निचर प्रत्येकाच्या घरात असते. सुंदर आणि स्वच्छ फर्निचर घराची शोभा वाढवते. पण, घराची शोभा वाढविण्याच्या या फर्निचरची स्वछता राखणे आणि त्याची चमक टिकविणे अत्यंत गरजेचे असते. ज्याप्रमाणे आपण रोज घराची सफाई करतो, त्याचप्रमाणे वूडन फर्निचरही स्वछता राखायला हवी. वूडन फर्निचरची दररोज साफसफाई न केल्यास ते जुने आणि अस्वच्छ दिसू लागते. पण, तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो केल्यास तुमचे जुने वूडन फर्निचर पुन्हा चमकू लागेल.

फर्निचर चमकविण्यासाठी सोप्या टिप्स –

खोबरेल तेल (coconut oil) –

खोबरेल तेल प्रत्येकाच्या घरात असते. वूडन फर्निचरची चमक पुन्हा आणण्यासाठी खोबरेल तेल अत्यंत प्रभावी मानले जाते. यासाठी तुम्हाला ५ चमचे खोबरेल तेल घेऊन त्यात १ चमचा व्हेजिटेबल ऑइल मिक्स करायचे आहे. तयार मिश्रणात मऊ सुती कापड ओले करून घ्या आणि आता वूडन फर्निचरवर एकाच दिशेने फिरवा. या हॅकने फर्निचर चमक पुन्हा मिळण्यास मदत होईल.

- Advertisement -

लिंबाचा रस (Lemon Juice) –

वूडन फर्निचर स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस हा देखील उत्तम पर्याय आहे. यासाठी लिंबाचा रस कापडावर घेऊन फर्निचर पुसून घ्या. याने फर्निचरवरील सर्व घाण निघून जाण्यास मदत होईल.

ऑलिव्ह ऑइल आणि विन्हेगर (olive oil and vinegar) –

ऑलीव्ह ऑइल आणि व्हिनेगर समप्रमाणात मिक्स करून घ्या. आता तयार मिश्रण मऊ कापडात बुडवून फर्निचर पुसून घ्या. काही मिनिटे तसेच असुद्या आणि नंतर कोरड्या कपड्याने संपूर्ण फर्निचर पुसून घ्या.

- Advertisement -

पेट्रोलियम जेली (Petrolium Jelly) –

पेट्रोलियम जेली म्हणजेच व्हॅसलिन वूडन फर्निचर चमकविण्यासाठी एक प्रभावी मार्ग मानला जातो. यासाठी संपूर्ण फर्निचरवर पेट्रोलियम जेली लावावी लागेल. यानंतर त्यावर हलक्या हाताने पाणी शिंपडा. काहीवेळा नंतर स्वच्छ कपड्याने फर्निचर पुसून घ्या.

मिनरल ऑइल ( Mineral oil) –

वूडन फर्निचर खूप जुने झाले असेल तर त्यासाठी तुम्ही मिनरल ऑईलचा वापर करू शकता. जुन्या फर्निचरवर मिनरल ऑईलने पेंट करा. याने फर्निचरची हरवलेली चमक पुन्हा येऊ शकेल.

 

 

 


हेही पहा : सिल्कच्या साड्यांची अशी घ्या काळजी

Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -

Manini