घरताज्या घडामोडीHeavy Rain In Dubai : दुबईची झाली तुंबई! मुसळधार पावसामुळे दुबईतील एअरपोर्ट,...

Heavy Rain In Dubai : दुबईची झाली तुंबई! मुसळधार पावसामुळे दुबईतील एअरपोर्ट, मॉल पाण्याखाली

Subscribe

भारतासह जगभरातील वातावरणात बदल होत आहे. बदलत्या वातावरणाचा जगातील अनेक देशांना फटका बसला आहे. याच बदललेल्या वातावरणामुळे दुबईची तुंबई झाली आहे. मुसळधार पावसामुळे दुबईत पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही तास पडलेल्या पावसामुळे अनेक शहरं पाण्याखाली गेली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Dubai Heavy Rain, संयुक्त अरब अमिराती : भारतासह जगभरातील वातावरणात बदल होत आहे. बदलत्या वातावरणाचा जगातील अनेक देशांना फटका बसला आहे. याच बदललेल्या वातावरणामुळे दुबईची तुंबई झाली आहे. मुसळधार पावसामुळे दुबईत पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही तास पडलेल्या पावसामुळे अनेक शहरं पाण्याखाली गेली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या मुसळधार पावसाचा रस्ते वाहतुकीसह विमान सेवेलाही बसला आहे. या पावसामुळे दुबईतील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. (Heavy Rain In Dubai thunderstorms swept across the United Arab Emirates leading to significant flooding in Dubai)

दुबईत काही तास झालेल्या पावसामुळे अनेक शहरं पाण्याखाली गेली. दुबईत निर्माण झालेल्या पूरस्थितीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा सुरू झालेला पाऊस मंगळवार सकाळपर्यंत सुरू होता. पावसाची संततधार सुरू असल्याने यूएईच्या अनेक भागांमध्ये पाणी साचले.

- Advertisement -

राजधानी दुबईत अतिवृष्टीनंतर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. दुबईतील रस्ते, घरे आणि मॉलमध्ये पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहेत. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. राष्ट्रीय हवामान केंद्राने देशातील अनेक भागात रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच, बुधवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, संयुक्त अरब अमिराती आणि आसपासच्या देशांमध्ये मुसळधार पाऊस झाला. दुबईत सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे तर, दुबईच्या शेजारी असलेल्या ओमानमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने 18 जणांचा मृत्यू झाला आहे. दुबई आणि अबुधाबीसह अनेक मोठ्या शहरांमध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा युएईच्या हवामान विभागाने दिला आहे.


हेही वाचा – Weather Update Today : काळजी घ्या! मुंबई, ठाण्यासह कोकणाला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -