Tuesday, April 30, 2024
घरमानिनीKitchenलोणचे वर्षभर टिकवण्यासाठी सोप्या टिप्स करा ट्राय

लोणचे वर्षभर टिकवण्यासाठी सोप्या टिप्स करा ट्राय

Subscribe

उन्हाळ्यामध्ये वर्षभरासाठी अनेक महिला पापड, कुरडया आणि लोणचे बनवतात. मात्र, हे लोणचे वर्षभरासाठी टिकवून ठेवणे कठीण असते. लोणच्याची साठवण योग्यरीत्या न केल्यास त्या लोणच्याला बुरशी देखील येते. मात्र काही वेळा या लोणच्याची साठवण कशी करावी? हा प्रश्न पडतो. परंतु योग्य काळजी घेतल्यास लोणचे वर्षभर उत्तम टिकून राहिल.

Kadumanga Achar, Mango Pickle | yummyntasty.com

- Advertisement -

 

  • लोणचे बनवताना सर्वप्रथम जी फळे आपण वापरणार आहोत ती फळे ताजी आणि स्वच्छ घ्यावी. मीठ हे प्रिझव्‍‌र्हेटिव्हज् असल्याने लोणच्यामध्ये अधिक प्रमाणात मीठ घालावे.
  • ज्या बरणीमध्ये लोणचे भरणार आहात, ती बरणी स्वच्छ धुऊन घ्यावी. त्यानंतर ती बरणी तीन ते चार दिवस कडक उन्हात वाळवावी.
  • लोणच्याच्या फोडी तयार करताना स्टीलच्या सुरीचा वापर करावा.
  • लोणचे तयार करताना त्यामध्ये साखर आणि स्वच्छ गुळाचा वापर करावा.
  • साखर घातलेली लोणचे मंद आचेवर गरम करुन घ्या. हे गरम केलेले लोणचे थंड झाल्यानंतर बरणीत भरा. यामुळे लोणचे खराब होणार नाही.
  • तेल कडकडीत गरम करावे. मात्र, हे गरम तेल लोणच्याच्या फोडीत टाकताना ते थंड झाल्यावर टाकावे.
  • लोणच्याची बरणी दमट आणि अंधाराच्या ठिकाणी ठेवू नये.
  • लोणच्याची साठवण करताना प्लास्टिकच्या भांड्याचा वापर करु नये. लोणचे ठेवण्यासाठी काचेच्या किंवा चिनी मातीच्या भांड्याचा वापर करावा.
  • उकळत्या पाण्याच्या वाफेवर बरणीचे तोंड करुन ते निर्जंतुक करुन घ्यावे.
  • दररोज लागणारे लोणचे एका छोट्या काचेच्या बरणीत काढून घ्यावे. त्यामुळे साठवण करुन ठेवलेल्या बरणीत दररोज चमचा घालावा लागणार नाही यामुळे लोणच खराब देखील होणार नाही.

हेही वाचा : सोप्या पद्धतीने बनवा नाचणीचे पापड

- Advertisment -

Manini