Tuesday, May 14, 2024
घरमानिनीRelationshipवहिनीसोबतचे नाते नणंदेला 'या' कारणांस्तव वाटते insecure

वहिनीसोबतचे नाते नणंदेला ‘या’ कारणांस्तव वाटते insecure

Subscribe

सासरी सासू-सुनेचे नाते कसे असते हे सर्वांनाच माहिती असते. त्याबद्दल चर्चा ही वेळोवेळी केल्या जातात. पण नणंद आणि भावजय यांचे नाते मात्र थोडंस गडबडीचे असू शकते. कारण या नात्याबद्दल कोणालाही फारसं बोलायला आवडत नाही. काही वेळेस नात्यात वाद होतात तर काही वेळेस एकमेकांना समजून घेतले जाते. पण मागून काही गोष्टी एकमेकांच्या बोलल्या जातात. अशातच नणंदेला आपल्या वहिनीसोबतचे नाते इंसिक्युर का वाटते याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात. (Relationship advice)

-वर्किंग वुमन असल्याचा कधीकधी राग येतो
प्रत्येकाचे नशीब असते. त्यानुसार त्यांना आयुष्यात काही गोष्टी मिळतात. घरात सुक्षितीत वहिनी असेल तर तिला काही गोष्टी आधीपासूनच माहिती असतात. सर्वांना कसे सांभाळून घ्यायचे असे काही. मात्र कामाचा व्याप अधिक असेल तर ती घराबाहेर अधिक राहते. अशातच सर्व भार सासूवर पडत असल्याचे जर नणंदेला दिसले तर तिला वहिनीबद्दल कधीकधी राग येतो.

- Advertisement -

-ती कसे ही कपडे घालू शकते
काही महिला या हेल्दी असतात पण त्यांना आपण घातलेले कपडे अगदी व्यवस्थितीत कॅरी करता येतात. त्यांचा फॅशन सेंन्स ही उत्तम असतो. अशातच नणंद यामध्ये कुठे मागे पडत असेल तर तिला वहिनीवर जेलेसी वाटते. अशातच तिला वाटत राहते की, तिने कोणतेही कपडे घातले तर ती माझ्यापेक्षा अधिक सुंदर दिसेल.

-आई माझ्यापेक्षा वहिनीचेच अधिक लाड करते
काही सासू आपल्या सुनेचे फार कौतुक सर्वांसमोर करत राहतात. अशातच नणंदेला वहिनीबद्दल थोडीशी इंसिक्युरिटी वाटत राहते. अशातच तिला असे ही वाटते की, आई ही माझ्यापेक्षा घरी आलेल्या सुनेचेच अधिक लाड करतेय.

- Advertisement -

-ती फार सुंदर आहे
वहिनी दिसायला अधिक सुंदर असेल तर कोणीही तिला पाहताच तिच्या सौंदर्याचे कौतुक करतो. पण नणंदेला काही वेळेस ही गोष्ट आवडत नाही. तिला असे वाटते की, माझ्या ती अधिक कशी सुंदर दिसू शकते अशी भावना ही तिच्या मनात उद्भवू शकते. त्यामुळे कधीकधी या कारणामुळे ही नणंदेला वहिनीबद्दल इंसिक्युर वाटू शकते.

-वहिनीऐवजी आई होण्याचा प्रयत्न करतेय
माझी वहिनी क्युट आहे. माझी काळजी तर घेते. पण कधीकधी ती वहिनी कमी आणि आई अधिक होण्याचा प्रयत्न करते. अशी तक्रार बहुतांश नणंदांची असते. त्यामुळे नात्यात यावरुन दुरावा येऊ लागतो.


हेही वाचा- टीना आणि रिया डाबी बहिणींचे ‘या’ महिन्याबरोबर आहे खास कनेक्शन

- Advertisment -

Manini