Tuesday, April 30, 2024
घरमानिनीRelationshipRelationship : नात्यात जपा या इमोशनल गोष्टी

Relationship : नात्यात जपा या इमोशनल गोष्टी

Subscribe

प्रेमाव्यतिरिक्त नातेसंबंधांचा पाया मजबूत होण्यासाठी इमोशनल गोष्टी खूप महत्वाची भूमिका बजावतात. लैगिक जवळीकतेशिवाय नाते मजबूत करण्यासाठी पार्टनरसोबत इमोशनली कनेक्टेड असणे जास्त महत्वाचे असते कारण प्रेम, विश्वास, काळजी यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींवर नाते अधिक टिकत असते. त्यामुळे नात्यात इमोशनल गोष्टी जपणे अत्यंत आवश्यक आहे. कोणतेही नाते दीर्घकाळ टिकविण्याची जबाबदारी नात्यातील दोघांच्याही खांद्यावर असते. जर दोघांमध्ये भावनिक अंतर निर्माण झाले तर नाते तुटण्याचे ते कारण बनू शकते. त्यामुळे नात्यातील इमोशनल गोष्टी अवश्य जपाव्यात.

नात्यात या इमोशनल गोष्टी अवश्य जपाव्यात –

- Advertisement -

विश्वास – नात्यात विश्वास नसल्यामुळे मानसिक ताणतणाव निर्माण होतात. व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहते आणि नातेसंबंध कमकुवत होऊ लागतो. नात्यातील विश्वास कमी झाल्यास प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींवर शंका घेणे हे सुरु होते. त्यामुळे नात्यातील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी नात्यात विश्वास असणे अत्यंत महत्वाचे आहे.

कनेक्टेड राहा – प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी आणि कोणतीही गोष्ट पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. असे असले तरी नात्यात एकमेकांशी कनेक्टेड असणे महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला हवा. अपयशात एकमेकांच्या पाठीशी उभे राहायला हवे. कारण अशा वागण्याने तुमच्यातील इमोशनल कनेक्शन टिकून राहते.

- Advertisement -

स्वीकार करणे – नात्यात इमोशनल गोष्टी टिकवून ठेवण्यासाठी दोघांमध्ये स्वीकृती असणे महत्वाचे आहे. नात्यात तुम्ही तुमचे निर्णय एकमेकांना सांगायलाच हवेत. एकमेकांचा सल्ला घ्यायला हवा तरच तुमच्यातील इमोशन्स टिकून राहतात.

सिक्युरिटी – निरोगी आणि आनंदी नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी नात्यात सुरक्षित वाटणे अत्यंत महत्वाचे असते. पार्टनरकडून इमोशनल आधार मिळाल्याने नात्यात व्यक्तीला सुरक्षित वाटते. अशाने व्यक्ती नात्यात सहजतेने गोष्टी शेअर करतो.

भावना समजून घेणे – एकमेकांच्या वागण्याबोलण्याचा नातेसंबंधावर कसा परिणाम होतो हे एकमेकांना समजणे खूप आवश्यक आहे. नात्यात पार्टनरकडून झालेल्या छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणे एकमेकांच्या चुका माफ करणे आवश्यक आहे. अशाने नात्यातील इमोशन्स जपले जातात.

आदर करा – अनोळखी लोकांसमोर पार्टनरचा अपमान करणे आणि त्याला अपशब्द ऐकविणे हे निरोगी नात्याचे लक्षण नाही. एकमेकांना समजून घेणे आणि पार्टनरच्या इच्छा आणि प्रतिभेचा आदर करणे आवश्यक आहे. यामुळे दोन व्यक्ती भावनिक दृष्ट्या जोडल्या जातात, ज्यामुळे नात्यात निर्माण झालेला दुरावा दूर होतो.

 

Edited by – chaitali Shinde


हेही पहा :

 

- Advertisment -

Manini