वहिनी आणि नणंदेचं नातं कसं असावं?

वहिनी आणि नणंदेचं नातं कसं असावं?

चंदा मांडवकर :

 

लग्नापूर्वी मुलींच्या मनात काही प्रकारचे प्रश्न आणि चिंता असते. नवे घर आणि नव्या लोकांसोबत आपले जमेल की नाही किंवा ती लोक आपल्याशी जमवून घेतील की नाही असे विविध विचार डोक्यात सुरु असतात. परंतु नेहमीच पाहिले जाते की, वहिनी आणि दीराचे नाते खुप प्रेमळ असते. मात्र नणंदेचे आणि वहिनीच्या नात्यात काही प्रेम ही असतेच पण कटुता ही काही वेळस येते. बहुतांश मुली या आपल्या नणंदे सोबत उत्तम नाते बनवू नाहीत. अशातच त्या दोघांमध्ये वाद, भांडण होत असल्याचे दिसून येते. मात्र जर तुम्हाला वाटत असेल की, सासरी सर्व लोकांसह तुमचे आणि नणंदेचे नाते उत्तम असावे तर पुढील काही टीप्स तुमच्या कामी येतील.

मैत्रीणचे नाते

बहुतांश नणंद आणि वहिनी यांच्यामधील वयाचे अंतर हे समानच असते. अशातच जर तुम्ही नणंदेसोबत मैत्रीणीचे नाते घट्ट केल्यास तर तुमच्यात वाद कमी होतील. त्याचसोबत तुम्ही तिच्यासोबत शॉपिंग, फिरण्यासाठी सुद्धा जा. तिच्या समस्या जाणून घ्या आणि गरज भासल्यास तिला मदत ही करा.

एकमेकांचे कौतुक करावे

कोणासोबत ही नाते अधिक घट्ट करायचे असेल तर त्याच्या आवडीनिवडी अचूक ओळखा. अशातच तुम्ही नणंदेच्या किंवा वहिनीच्या काही गोष्टींचे कौतुक करा. यामुळे नात्यात मधुरता कायम राहिल.

एकमेकांसोबत आपल्या समस्या शेअर करा

नणंद आणि वहिनीचे नाते हे मैत्रीचे असावेच. जेणेकरून दोघांना एकमेकांच्या समस्या शेअर करता येतीलच. पण कठीण प्रसंगावेळी तुम्ही एकमेकांची साथ ही द्याल. असे नाते अधिक काळ टिकते.

एकमेकांच्या मदतीसाठी नेहमीच उभे रहा

काहीवेळेस असे होते की, जेव्हा मुली आपल्या भावाला एखादी गोष्ट सांगू शकत नाही तर ती गोष्ट आपल्या वहिनीला सांगू शकते. कारण मुली एकमेकांच्या समस्या समजून घेऊ शकता. अशातच नणंदेने आपल्या वहिनीशी बोलावे. जेणेकरून वहिनी तुमच्या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल.

नात्यात सन्मान हवा

नणंद आणि वहिनी मध्ये जरी समान वय असेल तरीही एकमेकांबद्दल सन्मान करता आला पाहिजे. नातेवाईक असो किंवा इतर मंडळी असो नणंदेने वहिनीला त्यांच्या समोर सन्मान द्यावा. त्याचपद्धतीने ही वहिनीने ही नणंदेला सन्मान दिला पाहिजे. अशाने दोघांमधील नाते अधिक घट्ट होऊ शकते.

भावापेक्षा अधिक मजबूत नाते असावे

काही वेळेस असे होते की, लग्नानंतर मुलगा हा आपल्या बायकोच्या अधिक जवळ होते. यामुळे दुसरी नाती दूर होतात. अशातच बहिण काही वेळेस नाराज होते. जेव्हा नवरा बहिणीला वेळ देत नाही तेव्हा वहिनीने तसे करण्यापासून अडवावे. जेणेकरुन नणंद आणि वहिनीचे नाते टिकून राहिल.


हेही वाचा :

हट्टी मुलांना कसे हाताळाल?

First Published on: February 14, 2023 4:32 PM
Exit mobile version