घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रAjit Pawar : अजित पवारांचा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल; दादांनी का आणि...

Ajit Pawar : अजित पवारांचा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल; दादांनी का आणि कोणत्या मतदारसंघातून भरला अर्ज

Subscribe

पुणे – बारामतीतील लोकसभा लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागले आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत बारामतीमध्ये होत आहे. बारामती मतदारसंघातून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी काल, गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. पुण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्याविरोधात त्यांची नणंद अर्थात तीन टर्मच्या खासदार सुप्रिया सुळे या मैदानात आहेत. त्यांनी देखील गुरुवारीच उमेदवारी अर्ज दाखल केला. नणंद – भावजय यांनी एकमेकांविरोधात लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले असताना आता अजित पवारांनीही लोकसभेसाठी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी पुणे कौन्सिल हॉलमध्ये रिटर्निंग ऑफिसरसमोर बारामती लोकसभेच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

अजित पवारांचा डमी अर्ज

राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांनी बारामती लोकसभा निवडणुकीत कोणतीच रिस्क नको म्हणून पत्नी सुनेत्रासोबत स्वतःचाही अर्ज दाखल केला आहे. अजित पवारांचा हा डमी अर्ज मानला जात आहे. सुनेत्रा पवारांचा अर्ज बाद झाला तर पक्षाची अधिकृत उमेदवारासाठी ऐनवेळी धावपळ नको म्हणून स्वतः अजित पवारांनीच नामांकन अर्ज दाखल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी आमदार विजय शिवतारे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत अजित पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

- Advertisement -
sunetra pawar file nomination for baramati
बारामती मतदारसंघासाठी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला

काय असतो डमी अर्ज

प्रत्येक राजकीय पक्ष एका उमेदवाराला अधिकृत उमेदवारी देत असतो. त्यासाठी त्यांना पक्षाचा ए-बी फॉर्म दिला जातो. मात्र अधिकृत उमेदवाराचा उमेदवारी अर्ज कोणत्याही कारणाने बाद ठरल्यास, पक्षाकडे एक असा उमेदवार आवश्यक असतो ज्याला ऐनवेळी ए-बी फॉर्म देऊन अधिकृत उमेदवार घोषित केले जाईल. प्रत्येक पक्ष डमी उमेदवारी अर्ज दाखल करुन ही सावधगिरी आता बाळगत आहे. याचाच कित्ता अजित पवारांनी बारामतीमध्ये गिरवला आहे. सुनेत्रा पवार यांच्यासोबत अजित पवार यांनीही बारामतीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, मात्र त्यांचा उमेदवारी अर्ज हा डमी आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार याच असणार आहेत.

हेही वाचा : Lok Sabha 2024 : सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडून घेतले कर्ज, प्रतिज्ञापत्रातून उघड

- Advertisement -

पहिल्या टप्प्यातच काँग्रेसला डमी उमेदवाराचा फायदा

आज राज्यात पहिल्या टप्प्याचे मतदान सुरु आहे. विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरु आहे. या पहिल्या टप्प्यातच काँग्रेसला डमी उमेदवाराचा फायदा झाला. रामटेक लोकसभा मतदारसंघातून पक्षाने रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांच्या जात पडताळणीच्या अर्जावर विरोधकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे निवडणूक आयोगाने रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द ठरवली. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. मात्र रश्मी बर्वे यांचे पती शामराव बर्वे यांनी डमी अर्ज दाखल केलेला होता. त्यामुळे काँग्रेसने रश्मी यांचा अर्ज बाद झाल्यानंतर त्यांच्या पतीला एबी फॉर्म देऊन काँग्रेसचे अधिकृत उमेदवार घोषित केले. यामुळे ऐनवेळी काँग्रेसचा उमेदवारच मैदानात नाही, ही नामुष्की पक्षाला टाळता आली.

हेही वाचा : Sunetra Pawar : बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवारांवर शून्य रुपये कर्ज; उत्पन्न पतीपेक्षा कोट्यवधीने जास्त

Edited by – Unmesh Khandale 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -