पायाखाली उशी ठेवून झोपण्याचे फायदे

पायाखाली उशी ठेवून झोपण्याचे फायदे

दिवसभर काम केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की, त्यांना व्यवस्थिती झोप लागावी. अशातच काही झोपण्याची पद्धत फॉलो करून आरोग्यासंबंधित फायदे होऊ शकतात. तर पायांखाली उशी ठेवून झोपण्याचे फायदे नक्की काय होतात हे पाहूयात.

पायांची सूज कमी होते
काही वेळेस पाय असेच मोकळे सोडून झोपल्याने पायांना सूज येऊ शकते. रात्री झोपताना पायाखाली उशी ठेवून झोपल्याने फूट रिटेंशन कमी होते. त्यामुळे सूजेची समस्या होऊ शकते.

शरिर सुन्न पडते
काही वेळेस शरिरात ब्लड सर्कुलेशन व्यवस्थितीत नसेल तर एखादा हिस्सा सुन्न पडतो. अशावेळी रात्री झोपताना पायाखाली उशी ठेवल्याने ही समस्या कमी होऊ शकते.

कंबरदुखीपासून आराम
आजकालच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये प्रत्येकालाच कंबरदुखीची समस्या उद्भवत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस पायाखाली उशी घेऊन झोपल्यास आराम मिळू शकतो.

थकवा दूर होतो
संपूर्ण दिवस काम केल्यानंतर शरिर थकते. म्हणून पायांना सुद्धा आराम मिळावा यासाठी रात्री झोपताना पायाखाली उशी ठेवून झोपावे.

स्नायूदुखीपासून आराम
पायाखाली उशी ठेवून झोपल्याने शरिराला आराम मिळतो. अशातच स्नायू खेचल्यासारखे होत नाहीत आणि दुखण्यापासून आराम मिळतो.

ब्लड सर्कुलेशन सुधारते
काही वेळेस रात्री झोपताना ब्लड सर्कुलेशन योग्य होत नाही. तर पायाखाली उशी ठेवून झोपल्याने ब्लड सर्कुलेशन सुधारण्यास मदत होऊ शकते.


हेही वाचा- हाता-पायांना मुंग्या येण्याची ‘ही’ आहेत कारणे

First Published on: August 24, 2023 7:15 PM
Exit mobile version