Friday, September 29, 2023
घर मानिनी Health हाता-पायांना मुंग्या येण्याची 'ही' आहेत कारणे

हाता-पायांना मुंग्या येण्याची ‘ही’ आहेत कारणे

Subscribe

जेव्हा तुम्ही दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून राहता तेव्हा तुमचे हात-पाय सुन्न पडतात. अशातच हातपाय जरा जरी हलवले तरी मुंग्या आल्यासारखे वाटते. नंतर ही स्थिती सामान्य होते. बहुतांश लोक याकडे दुर्लक्ष करतात. परंतु ही समस्या सातत्याने होत असेल तर डॉक्टरांना नक्की भेटावे. त्याचसोबत तुम्ही काही घरगुती उपायांनी सुद्धा हातापायांना येण्याची समस्या दूर करू शकता. तत्पूर्वी त्याची कारणे काय आहेत हे जाणून घेऊयात.

हाता-पायांना मुंग्या येण्याचे कारण
जर तुमच्या हातापायांना मुंग्या येत असतील तर याचे मुख्य कारण मज्जासंस्था व्यवस्थितीत काम करत नसेल. याच कारणास्तव खुप दुखण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. या व्यतिरिक्त जीवाणू किंवा व्हायरल संक्रमण, शरिरातील विषारी पदार्थ वाढणे, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, व्हिटॅमिन बी-12 च्या कारणास्तव होऊ शकते.

- Advertisement -

उपाय काय
हळदीचे दूध प्या

- Advertisement -

दूधात काही अँन्टीऑक्सिडेंट्स आणि अँन्टी इंफ्लेमेंटरी गुण असतात. जे तुमच्या हातांना येणाऱ्या मुंग्यांची समस्या कमी होऊ शकते. खरंतर हळदीत असणाऱ्या गुणांमुळे शरिरात ब्लड सर्कुलेनश उत्तम होते.

कोमट पाण्याचे सेवन करा


जर तुमच्या हातापायांना मुंग्या येत असतील तर कोमट पाणी प्या. असे करणे फायदेशीर ठरू शकते. कोमट पाण्याच्या सेवनाने मुंग्या येण्याची समस्या कमी होऊ शकते.

दररोज योगा करा


ब्लड सर्कुलेशन उत्तम राहण्यासाठी तुम्ही दररोज योगासन करु शकता. यामुळे हाता-पायांना येणाऱ्या मुंग्यांची समस्या कमी होऊ शकते.


हेही वाचा- रात्रीचे ठेवलेले पाणी पिणे किती सुरक्षित?

- Advertisment -

Manini