Thursday, May 16, 2024
घरमानिनीRecipeRecipe : चटपटीत पनीर दहीवडे

Recipe : चटपटीत पनीर दहीवडे

Subscribe

पनीरपासून आपण नेहमीच वेगवेगळ्या रेसिपी बनवतो. आज आम्ही तुमच्यासाठी खास पनीर दहीवड्याची रेसिपी घेऊन आलो आहोत.

साहित्य :

  • 200 ग्रॅम पनीर
  • 4 कप दही
  • 2 उकडलेले बटाटे
  • 1-2 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या
  • आलं
  • 1 कप हिरवी चटणी
  • 2 मोठे चमचे भाजलेले जिरे
  • 1/2 चमचा लाल मिरची पावडर
  • 1/2 चमचा मिरपूड
  • 2 चमचे काळे मीठ
  • चवीनुसार मीठ
  • तेल तळण्यासाठी

कृती :

Dahi Vada Recipe | Shallow Fried Dahi Vada | MadhurasRecipe - YouTube

- Advertisement -
  • सर्वप्रथम पनीर आणि बटाटे कुस्करुन घ्या आणि चांगल्या प्रकारे एकत्र करा.
  • या मिश्रणामध्ये आलं, हिरवी मिरची आणि मीठ टाकून चांगल्या प्रकारे मळून घ्या.
  • आता याचे गोल वडे तयार करा आणि हे वडे तळण्यासाठी कढईत टाका.
  • सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. हे सर्व्ह करण्यासाठी तीन-चार वडे प्लेटमध्ये घ्या.
  • त्यावर दही, काळे मीठ, भाजलेले जिरे, मिरपूड, लाल मिरची पावडर, गोड चटणी, हिरवी चटणी टाका आणि खायला घ्या.

 


हेही वाचा :

- Advertisment -

Manini