घरमहाराष्ट्रपुणेPune Accident News : कात्रजच्या नवीन बोगद्यात 5 वाहनांचा विचित्र अपघात; गाड्यांचे...

Pune Accident News : कात्रजच्या नवीन बोगद्यात 5 वाहनांचा विचित्र अपघात; गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Subscribe

पुणे : कात्रजच्या नवीन बोगद्यात आतमध्ये दुरुस्तीचे काम सुरू असताना पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. एक चारचाकी गाडी अचानक थांबल्यामुळे तिच्या पाठीमागून येणाऱ्या 4 ते 5 गाड्या एकमेकांवर धडकल्या. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नसले तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. (Pune Accident News  Freak accident involving 5 vehicles in new tunnel of Katraj Extensive damage to cars)

मिळालेल्या माहितीनुसार, सातारामार्गे पुण्यात येताना भुयारी मार्गात आज दुपारी सुमो गाडीने ब्रेक मारल्याने हा अपघात झाला. सुमो गाडीने अचानक ब्रेक मारल्यामुळे सहा गाड्या एकमेकांवर धडकल्या. दुचाकीस्वाराने सुमो गाडीला पुढून कट मारल्यामुळे चालकाने गाडीवरील नियंत्रण सुटू नये म्हणून अचानक ब्रेक मारला. परंतु मागून वेगात असलेल्या सहा गाड्या एकमेकांना धडकल्या.

- Advertisement -

अपघातानंतर घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र थोड्या वेळात घटनास्थळी भारती विद्यापीठ वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे, तसेच वाहतूक विभागाकडील अंमलदार तत्काळ दाखल झाले आणि अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे. तसेच जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सविस्तर माहिती लवकरच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -