उन्हाळ्याच्या दिवसात अनेक गृहिणी घरच्या घरी लोणचे करतात. मात्र, बऱ्याचदा आंब्याचे, मिरचीचे लोणचे केले जाते. आज आम्ही तुम्हाला झटपट असे चटपटीत गाजराचे लोणचे कसे करायचे ते दाखवणार आहोत.
साहित्य :
- 1/2 किलो गाजरं
- 50 ग्रॅम कुठलाही तयार लोणचे मसाला
- काश्मिरी लाल तिखट मसाला
- 2 मोठ्या लिंबांचा रस
- 2 चमचे मीठ
- 1/2 चमचा हळद
- 100 ग्रॅम तेल
- 50 ग्रॅम राई
- 1/4 चमचा हिंग
कृती :
- Advertisement -
- सर्वप्रथम एका कढईत तेल घ्यावे.
- त्यानंतर तेल कडकडीत तापल्यावर त्यात राई आणि हिंग टाकून त्याची खमंग फोडणी तयार करा. नंतर ती थंड करायला ठेवा.
- दरम्यान गाजराचे चांगले बारीक तुकडे करून घ्या.
- त्यात लिंबाचा रस, मीठ, मसाला, हळद टाकून सर्व मिश्रण चांगले एकजीव करा.
- मग त्यात थंड झालेली फोडणी टाकावी आणि परत एकदा मिश्रण चांगले एकजीव करून एका बरणीत भरून ठेवा.
- अशाप्रकारे झटपट घरच्या घरी गाजराचे लोणचे तयार.
हेही वाचा :