Tuesday, May 21, 2024
घरमानिनीRecipeRecipe : गाजराचं पौष्टिक लोणचं

Recipe : गाजराचं पौष्टिक लोणचं

Subscribe

उन्हाळ्यात आपण कैरी, लिंबाचे लोणचे बनवतो. आज आम्ही तुम्हाला गाजराचे लोणचं कसे बनवायचे हे सांगणार आहोत.

साहित्य :

 • 7-8 गाजर
 • पाव किलो गूळ
 • 4 जरदाळू
 • 3-4 काळा मनुका
 • 5 खारीक
 • 3 चमचे तिखट
 • मोहरी पावडर
 • मीठ (चवीनुसार)
 • आल्याचा छोटा तुकडा
 • 1/2 वाटी व्हिनेगर (प्रमाणानुसार)

 

- Advertisement -

कृती : 

Gajar Ka Achar | Carrot Pickle Recipe | Tasty And Quick Pickle Recipe : r/IndianFoodPhotos

 • सर्वप्रथम गाजरं किसून घ्यावी. यानंतर खारीक धुवून, पुसून त्याचे तुकडे करून घ्यावे. यासोबतच जरदाळू धुवून त्याचे तुकडे करून घ्यावे.
 • हे झाल्यावर मनुका धुवून पुसून घ्याव्या. आल्याचे छोटे लांबट तुकडे करावे.
 • आता एका मोठ्या पातेल्यात व्हिनेगर व मोहरी पावडर घालून रवीने चांगलं घुसळावं.
 • त्यात तिखट, मीठ व गूळ घालून गॅसवर ठेवावं. गूळ विरघळल्यावर गाजर कीस, खारीक तुकडे, जरदाळूचे तुकडे, मनुका व आल्याचे तुकडे घालावे.
 • यात पाणी अजिबात घालू नये व झाकण ठेवू नये.
 • हे करत असताना मधून मधून हे मिश्रण हलवत राहावं.
 • आता मिश्रण घट्ट झालं की ते पूर्ण गार झाल्यावर बरणीत भरून ठेवावं.

हेही वाचा :

Recipe : मिरचीचं झणझणीत लोणचं

- Advertisment -

Manini