घरताज्या घडामोडीअवकाळी पावसाचा पुण्याला फटका; वीज गेल्याने नागरिक हैराण

अवकाळी पावसाचा पुण्याला फटका; वीज गेल्याने नागरिक हैराण

Subscribe

मागील अनेक दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाचा पुण्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. पुण्यात वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

मागील अनेक दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाचा पुण्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. पुण्यात वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तसेच, पुण्यातील अनेक भागांतील लाईटही गेली. त्यामुळे पुणेकरांना अवकाळी त्रास सहन करावा लागत आहे. (Electricity Power Cut In Pune Due To Heavy Unseasonal Rain Maharashtra)

राज्यात शुक्रवारपासून सर्वत्र अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. शनिवारी मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. आज पुण्यात अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. पुण्यातल्या वडगाव धायरी येथे विजेच्या कडकडाट व वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस तसेच वडगाव धायरीमध्ये वीज गेली आहे. रामटेकडी, वैदूवाडी भागात विजेच्या प्रचंड गडगडाटासह जोरात पाऊस सुरू झाला आहे. मुंढवा, केशवनगर, खराडी भागामध्ये पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

पुण्यातल्या घोरपडी परिसरातदेखील जोरदार पाऊस सुरू झाला असून वीज पुरवठा खंडित झाला आहे. पुण्यातल्या अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडी झाली आहे. त्याशिवाय तळजई भागात गारपीट झाल्याची माहिती आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, गारा आणि वादळी वाऱ्यासह आज अवकाळी पाऊस होऊ शकतो.

हवामान विभागाकडून आज दुपारपासून पावसाचा इशारा देण्यात आला होता. यामध्ये सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, नांदेड, जालना, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश असून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘बार्टी’ फेलोशिपसाठी विद्यार्थ्यांचे ऊन-वाऱ्यात सलग ५० दिवस धरणे आंदोलन; मुख्यमंत्री लक्ष देणार का, विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -