कडू मेथीचे गोड फायदे

कडू मेथीचे गोड फायदे

Methi

चवीला कडू असणारी मेथी शरीरासाठी आरोग्यदायी असते. मेथीच्या भाजीप्रमाणेच तिचे दाणेही गुणकारी आहेत. भारतात जवळपास सर्वच ठिकाणी मसाल्यांमध्ये मेथीच्या दाण्याचा वापर केला जातो. मसाल्यांव्यतिरिक्त मेथीच्या दाण्यांचा वापर कसा करावा हे जाणून घेऊयात.

उच्च रक्तदाब कमी करा – अर्धा चमचा मेथीचे दाणे घ्या. हे दाणे रात्रभर गरम पाण्यात भिजवा. सकाळी उठून हे पाणी पिऊन घ्या आणि मेथीचे दाणे चावून खा. असे केल्याने उच्च रक्तदाब लवकरच कमी होईल.

भाजल्याचे व्रण दूर करा – मेथीच्या दाण्याची पावडर तयार करून त्याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट लावल्याने शरीरावरील भाजल्याचे व्रण दूर होतात.

वजन कमी करा – विशेषतः महिलांनी नियमित ३ ग्रॅम मेथीच्या दाण्यांचे सेवन करावे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होऊन हार्मोन्सही संतुलित राहतात.

केस गळती थांबवा – मेथीचे दाणे रात्रभर गरम खोबरेल तेलात भिजवून ठेवा. सकाळी उठून या तेलाने डोक्याला मसाज केल्याने केस गळणे हळूहळू बंद होईल.

केसातील कोंडा दूर करा – मेथीच्या दाण्यांची पेस्ट डोक्याला लावा. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवा. सुती कापडाने पुसा. कोंडा दूर होईल.अपचन, बद्धकोष्ठता झाल्यास अर्धा चमचा मेथीचे दाणे पाण्यासोबत घ्यावे. सकाळ, संध्याकाळ मेथीचे दाणे पाण्यासोबत घेतल्यास अपचन, बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल.

संधिवात पळवा – मेथी आणि सुंठ समप्रमाणात घेऊन चूर्ण तयार करून घ्यावे. या चूर्णामध्ये गूळ टाकून खाल्ल्यास संधिवाताची समस्या दूर होण्यास मदत होईल.त्याचप्रमाणे पोटातील गॅस, छातीतील कफ दूर करण्यासाठी मेथीचे दाणे फायदेशीर ठरतात. दररोज सकाळ-संध्याकाळ मेथी दाण्याच्या चुर्णाचे सेवन केल्यास वात रोग दूर होतात.

First Published on: February 11, 2019 5:33 AM
Exit mobile version