शेजवान नूडल्स, गार्लिक नूडल्स अशा वेगवेगळ्या प्रकारचे नूडल्स तुम्ही आत्तापर्यंत बनवले असतील. पण जर तुम्हाला खाण्यामध्ये व्हरायटी हवी असेल तर आम्ही सांगितलेली बटर चिकन नूडल्स एकदा नक्की ट्राय करा.
साहित्य :
- 2 बाऊल नूडल्स (वाफवून घेतलेले)
- 1 बाऊल चिकनचे तुकडे (वाफवून घेतलेले)
- 2 चमचे बटर
- 2 टोमॅटो
- 2 कांदे बारीक चिरलेले
- 1 चमचा आलं लसूण-पेस्ट
- 2 अख्खी लाल मिरची
- 4 लवंग, वेलची
- 1 तुकडा दालचिनी
- 1/2 वाटी काजू
- 2 चमचे बटर
कृती :
- सर्वप्रथम एका कढईत बटर गरम करून घ्या आणि त्यात कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, लाल मिरच्या, दालचिनी, काजू एक-एक करत 10 मिनिटे परतून घ्या.
- टोमॅटो मऊ शिजले की थंड झाल्यावर सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करा.
- आता दुसऱ्या कढईत पुन्हा बटर टाकून त्यात हे मिश्रण पुन्हा 3-4 मिनिटे परता त्यानंतर त्यात मीठ, चिमूटभर साखर टाकावी.
- नंतर त्यात नूडल्स आणि चिकनचे तुकडे देखील टाका आणि काही वेळ परतून घ्या.
- तयार बटर चिकन नूडल्स सर्व्ह करा.