घरमहाराष्ट्रपुणेRohit Pawar : कांदा निर्यात बंद ते महानंद; रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

Rohit Pawar : कांदा निर्यात बंद ते महानंद; रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

Subscribe

यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, कांद्याची होणारी निर्यात सरकारने थांबवली. त्यानंतर महाराष्ट्रातील सरकारमधील भाजप, अजित पवार गट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यापैकी कुणीच विरोध केला नाही. त्यासाठी कुणी पाठपुरवा केला नाही. काही दिवसापूर्वी मीडियावर अशी चर्चा सुरू झाली होती की, चार महिन्यानंतर निर्यात पुन्हा सुरु करण्यात आली.

पुणे : पुण्यातील मार्केट यार्डमधील व्यापाऱ्यांशी आज (22 फेब्रुवारी) शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी भेट घेत चर्चा केली. यावेळी रोहित पवारांनी कांदा निर्यात बंद ते महानंद दूध डेअरी गुजरातला जात असल्यावरुन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. (Rohit Pawar Onion export stop to Mahanand Rohit Pawars attack on the government)

यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, कांद्याची होणारी निर्यात सरकारने थांबवली. त्यानंतर महाराष्ट्रातील सरकारमधील भाजप, अजित पवार गट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यापैकी कुणीच विरोध केला नाही. त्यासाठी कुणी पाठपुरवा केला नाही. काही दिवसापूर्वी मीडियावर अशी चर्चा सुरू झाली होती की, चार महिन्यानंतर निर्यात पुन्हा सुरु करण्यात आली. शेतकऱ्यांकडील कांदा यादरम्यान व्यापाऱ्यांकडे गेला. परंतु उर्वरीत शेतकऱ्यांकडील कांदा विक्रीसाठी आणला तर कळाले की, तसा जीआरच निघाला नाही.

- Advertisement -

31 मार्चपर्यंत कांदा निर्यात बंद आहे. 31 मार्चपर्यंतच का असं येथील शेतकऱ्यांना विचारलं तर असं समजलं की, गुजरातमधील शेतकऱ्यांची आवक ही मार्चमध्ये सुरू होते. म्हणजेच गुजरातच्या शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून या दृष्टीकोणातून हा जीआर काढला की, काय? असा प्रश्न येथील शेतकरी विचारत आहेत. तेव्हा गुजरातच किती विचार सुरू आहे हे यातून जाणवते.

हेही वाचा : Anushka Sharma : अनुष्काची दुसरी डिलिव्हरी लंडनमध्ये करण्याचे मोठे कारण आले समोर

- Advertisement -

महानंदच्या जमिनीवर राजकारण्यांचा डोळा

पुढे बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, महानंदाची मुंबईमध्ये शेकडो एकर जमीन आहे. ती सर्व जमीन शहराच्या मध्यभागी आलेली आहे. आणि ती जमीन मुंबईच्या मध्यभागी आलेली आहे. महानंद चालविण्याठी जर योग्य प्रयत्न केले असते तर नक्कीच महानंद यशस्वी झालं असतं. बरेच सरकार आले आणि गेले परंतु त्यांना काही जमले नाही. कदाचित प्रामाणिक प्रयत्न कुणीच केले नाही. असे असतानाच आता अशी माहिती समोर आली आहे की, गुजरात सरकारच्या एका संस्थेला महानंद देण्यात येणार आहे. तेव्हा महाराष्ट्राने गुजरातला आयटी सेंटर गिफ्ट केलं. आयएफसी सेंटर गिफ्ट केलं. येथील व्यापार तिकडे नेला. हिरे व्यापार गिफ्ट केला. त्यामुळेच आता असा संशय येतोय की, महानंदच्या जमीनीवर राजकारण्यांची नजर आहे. त्यामुळे यामागे काही डील आहे का? अशीसुद्धा चर्चा लोकांमध्ये आहे.

हेही वाचा : Farmers Protest : शेतकरी आंदोलनाला समर्थन करणारे सोशल मीडिया अकाउंट होणार बंद; वाचा सविस्तर

महाराष्ट्राची अस्मित तुडवली जात असतानाही….

पुढे बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, वरळीमध्येही महानंदची मोठी मालमत्ता आहे. मात्र, हे होत असताना भाजप, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शांत आहेत. तेव्हा महाराष्ट्राची अस्मिता पायाखाली तुडवत असताना या नेत्यांना काहीही पडलेलं नाही. मात्र, यावर केंद्राचं नीट लक्ष आहे. यासोबतच पाच महिन्यात मंत्र्यांच्या बंगल्याच्या नुतनीकरणासाठी 30 कोटी रुपयांचा खर्च झाला. आधीचे बंगले काही वाईट नव्हते. तेव्हा 30 कोटी रुपयांचा खर्च होत असेल तर सर्वसामान्यांचा पैशाचा चुराडा केला जात असल्याचे दिसून येते असेही ते यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -