Wednesday, April 17, 2024
घरमानिनीLoneliness : आयुष्यात एकटेपणा जाणवतोय? फॉलो करा 'या' टिप्स

Loneliness : आयुष्यात एकटेपणा जाणवतोय? फॉलो करा ‘या’ टिप्स

Subscribe

सध्या लोक त्यांच्या आयुष्यात इतके व्यस्त झाले आहेत की एकमेकांसाठी वेळ काढणे फार कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत माणूस कधी एकाकी होतो हे कळत नाही. एकटेपणा कुणावरही वाईट प्रभाव पाडू शकतो. ब्रेकअप, घटस्फोट, प्रियजनांचा मृत्यू किंवा व्यवसायिक अपयश यांमुळे अनेकांना एकटेपणा जाणवतो. याशिवाय जास्त विचार केल्यानेही एकटेपणा येऊ शकतो. तुम्हीही ही भावना अनुभवत असाल तर यावर वेळीच उपाय केले पाहिजे. परंतु ही परिस्थिती वेळीच हाताळली नाही तर डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते. तुम्हालाही अशी समस्या असेल तर आज आम्ही तुम्हाला एकटेपणावर मात करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगत आहोत. या टिप्स फॉलो करून दूर करा एकटेपणा दुर करु शकता.

एकटेपणा समजून घ्या :

एकटेपणा ही काहीशी क्लिष्ट भावना आहे. काहींना गर्दीच्या ठिकाणीसुद्धा एकटं वाटतं. तर काहींना एकांतात असूनसुद्धा एकटेपणा जाणवत नाही. सामाजिक संवादाचं प्रमाण हे व्यक्तीनुसार बदलत असतं. ठरावीक प्रमाणात सामाजिक संवादाचीसुद्धा आवश्यकता असते. तो न मिळाल्यास व्यक्ती नैराश्याच्या गर्तेत जाण्याचा धोका असतो. दीर्घकालीन एकटेपणामुळे हृदयविकार, अल्झायमरचा त्रास उद्भवू शकतो.

- Advertisement -

तुमचा छंद जोपासा

प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता छंद असतो. पण, धकाधकीच्या जीवनात आपला छंद जोपासणे फार कठिण जाते. आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण, आता हिच वेळ आहे आपला छंद जोपासण्याची. तुम्ही तुमच्या या मौल्यवान वेळेत तुमचा छंद जोपासू शकता. तुम्हाला संगीत, नृत्य किंवा इतर कोणताही छंद असेल तर त्याला तुम्ही वेळ द्या. दररोजच्या दिवसातील केवळ अर्धा तास देखील तुम्ही तुमचा छंद जोपासा. यामुळे तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळण्यास मदत होईल.

नवीन व्यक्तीना भेटा

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटत असेल ना? पण, हे खर आहे. नवीन व्यक्तींना भेटल्याने तुमच्या गप्पा वाढतात आणि तुम्ही एकमेकांसोबत तुमचा वेळ घालवू शकता. त्यांच्यासोबत मैत्री करा. कधी त्यांच्यासोबत फिरण्याकरता जा किंवा त्यांना कधीतरी स्वत:च्या घरी बोलवा आणि छान गप्पा गोष्टी करा. एकमेकांच्या समस्या शेअर करा. यामुळे मन हलके होण्यास मदत होईल आणि तुमचा दिवस देखील छान जाण्यास मदत होईल.

- Advertisement -

मित्र मंडळींची मदत घ्या

जर तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्रानं किंवा मैत्रिणीनं मदतीसाठी बोलावलं तर त्यांना कॉल करून, मेसेज करून, जमल्यास प्रत्यक्ष भेटू शकता. यामुळे एकटेपणावर मात करण्यास मदत होईल.

नकारात्मक भावनांपासून जपा

नकारात्मक भावनांपासून दूर राहा. मत्सर, राग आणि स्वतःबद्दलचा द्वेष तुम्हाला मदत करणार नाही. तुमच्या दु:खाला सकारात्मक दिशा द्या. यामुळे तुमच्यातील नकारात्मकता कमी होईल आणि सकारात्मता वाढीस लागेल. एकटेपणा दूर करण्यासाठी अनेक गोष्टी तुम्ही करु शकता.

पाळीव प्राण्यांबरोबर राहा

पाळीव प्राणी तुमच्या मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकतात, असे विज्ञानात म्हटले आहे. पाळीव प्राणी तुमचा स्ट्रेस कमी करण्याबरोबर नैराश्याची लक्षणे दूर करण्यास मदत करु शकतात.

मनुष्य एक सामाजिक प्राणी आहे. समाजात राहणे मनुष्यासाठी गरजेचेही आहे. तरीही एकटेपणा जाणवणे ही असामान्य बाब नाही. त्यामुळे मित्रांबरोबर राहून आणि लोकांशी संपर्क वाढवून एकटेपणा दूर केला जाऊ शकतो

- Advertisment -

Manini