टेंशन आणि मूड स्विंगमध्ये घ्या लवंगचा चहा

टेंशन आणि मूड स्विंगमध्ये घ्या लवंगचा चहा

पुलाव ते चहाापर्यंतच्या रेसिपीसाठी लवंगाचा वापर केला जातो. यामुळे पदार्थाला एक वेगळीच चव येते. पण लवंगामुळे आरोग्याला काही फायदे सुद्धा होतात. यामुळे शरीरातील बॅक्टेरियल इंन्फेक्शनचा धोका कमी होतो. या व्यतिरिक्त लवंगाचे सेवन केल्याने शरिरात व्हिटॅमिन, मिनिरल आणि फायरबरची पुर्तता पुर्ण होते. बहुतांश लोक चहामध्ये लवंग टाकून पिणे पसंद करतात. अशातच लवंगाच्या चहाने फायदे काय होतात हे जाणून घेऊयात.

एक्सपर्ट्स असे म्हणतात की, लवंगामध्ये अँन्टी इंफ्लेमेंटरी आणि अँन्टीव्हायरल गुण असतात. यामुळे आपले शरीर काही समस्यांपासून दूर राहते. तुम्ही दररोज जेवणात लवंगाचा वापर करत असाल तर शरीर संक्रमण आणि सूजेच्या समस्येपासून दूर राहू शकते. खासकरुन लवंग तुम्ही चहामध्ये वापरू शकता.

लवंगाच्या चहाचे फायदे
मूड स्विंग होण्यापासून दूर रहाल
एका रिसर्चनुसार लवंगाच्या चहामुळे तणाव कमी होतो. तो प्यायल्याने शरीरात हॅप्पी हार्मोन्स बूस्ट होतात. यामुळे तुम्ही दिवसभर मूड स्विंगच्या समस्ये पासून दूर राहता. याच्या नियमित सेवनाने तुम्ही अॅक्टिव राहू शकता.

ब्लड शुगर रेग्युलेट होते
याच्या सेवनाने ब्लड शुगरचा स्तर नियंत्रित राहण्यास मदत होते. यामध्ये असणारे कपाउंड नाइजीरिसिन ब्लड सेल्सच्या फंक्शनला सुधरवण्यासह इंसुलिन वाढवण्याचे काम करते. खरंतर इंसुलिन एक असा हार्मोन आहे जे साखरेला ब्लड ते सेल्स पर्यंत पोहचवण्याचे काम करतो. ब्लड शुगरचा स्तर नियंत्रित ठेवण्यासाठी इंसुलिन महत्त्वाची भुमिका पार पाडतो. त्यामुळे लवंगाची चहा पिणे आरोग्यासाठी उत्तम असते.

रोगप्रतिकारकशक्ती सुधारते
लवंगाची चहा प्यायल्याने आपले शरीर ऑक्सीडेटिव तणावापासून दूर राहते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन आणि मिनिरल्स शरीराला क्रोनिक डिजीजपासून दूर ठेवतात. याच्या नियमित सेवानाने आपले शरीर काही आजारांपासून दूर राहते. यामध्ये असलेले युजेनॉल एक नैसर्गिक अँन्टीऑक्सिडेंट आहे. त्यामुळे शरिरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढली जाते.

वजन कमी करण्यास फायदेशीर
अँन्टी कोलेस्टेरेमिक आणि अँन्टी लिपीड प्रॉपर्टीच्या कारणास्तव लवंगाच्या चहाचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होईल. याच्या सेवनाने मेटाबॉलिज्म सुधारतो. त्याचसोबत शरिरात जमा झालेले अतिरिक्त फॅट ही बर्न होतात.


हेही वाचा- अनेक आजारांवर रामबाण आहे जिऱ्याचे ‘हा’ उपाय

First Published on: August 29, 2023 2:56 PM
Exit mobile version