नाश्तामध्ये ‘या’ फळांचा करा समावेश

नाश्तामध्ये ‘या’ फळांचा करा समावेश

फळ

बऱ्याचदा नाश्ता म्हटलं का काय खावे असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यात ऑफिसला जाणाऱ्यांना नाश्ता करण्यास वेळ देखील नसतो. मग, अशावेळी काय करावे? तर बरीच जण मैद्यापासून तयार झालेली बिस्कीट खातात आणि नाश्ता करुन मोकळे होतात. मात्र, तसे न करता तुम्ही नाश्ताला काही फळांचे सेवन केल्यास तुम्हाला त्याचा अधिक चांगला फायदा होण्यास मदत होईल. तसेच तुमची पचनसंस्था देखील सुधारेल.

पपई

पपई ही १२ ही महिने बाजारात उपलब्ध असते. त्यामुळे पपई ही सर्रास खाल्ली जाते. मात्र, ही जर नाश्ताला खाल्ली तर त्याचा अधिक चांगला फायदा होता. कारण पपई ही पचनसंस्थेसाठी आणि आरोग्यासाठीही उत्तम फळ आहे.

सफरचंद

सफरचंदात भरपूर व्हिटॅमिन ए आणि सी असते. शिवाय यात भरपूर मिनरल्स आणि पोटॅशियम देखील असतात. तसेच भरपूर प्रमाणात फायबरचाही समावेश असतो.

काकडी

काकडीतील एरेप्सीन नावाचे द्रव्य पचनाच योग्य मदत करते. तसेच पोटातील उष्णता, पित्त, जठराची सूज यावर काकडीसारखा साधा पदार्थ चमत्कारी परिणाम दाखवतो.

केळ

बाराही महिने बाजारात उपलब्ध असणारी केळी नाश्ताला नक्की खावी. केळ्यामध्ये बरपूर प्रमाणात फायबर असल्याने पोट साफ होण्यासही मदत होते.

मध – लिंबू

कोमट पाण्यात मध आणि लिंबू घालून त्याचे सेवन करावे. यामुळे आपली पचनक्रिया सुधारते शिवाय आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती देखील वाढण्यास मदत होते.

 

First Published on: July 10, 2020 6:53 AM
Exit mobile version