Thursday, May 9, 2024
घरमानिनीतुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी करु शकतात 'या' गोष्टी

तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी करु शकतात ‘या’ गोष्टी

Subscribe

तंदुरुस्त राहण्यासाठी आपली रोगप्रतिकाराक शक्ती उत्तम असणे फार गरजेचे असते. मात्र ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असते त्यांना लगेच आजारांचे संक्रमण होते. कोरोनानंतर लोक रोगप्रतिकाराक शक्तीसंदर्भात अधिक जागृत राहू लागले आहे. कोरोनाच्या वेळी सुद्धा हे समोर आले होते की, ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असते त्यांना आजाराची लढण्यास फार मोठी मदत मिळते. अशातच आपल्याला हेल्दी राहण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती ही नेहमीच तगडी असावी असे सांगितले जाते.

या व्यतिरिक्त आपण जे काही खातो त्याकडे सुद्धा लक्ष द्यावे. मात्र अशा काही गोष्टी आहेत ज्यांची आपण सवय लावल्यास त्याचा परिणाम आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर सुद्धा होतो, आपण बऱ्याच वेळा अशा काही गोष्टी खातो ज्या आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी नेहमीच अयोग्य असतात. याच बद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत.

- Advertisement -

-प्रोसेस्ड फूड

   
जर तुम्हाला तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करायची असेल तर तुम्ही तुमच्या खाण्यातून प्रोसेस्ड फूड पासून दूर रहा. यामध्ये मीठ, साखर आणि अनहेल्दी फॅट्सचे प्रमाण अधिक असते. त्यामुळेच ते आपल्या शरिरात इंफ्लेमेशनचे कारण बनतात. दीर्घकाळापर्यंत प्रोसेस्ड फूडचे सेवन केल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होऊ लागते.

- Advertisement -

-शुगर ड्रिंक्स


साखरेचे अत्याधिक सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी उत्तम नसते. शरिरातील ब्लड शुगर वाढते आणि आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर त्याचा परिणाम होतो. सोडा, एनर्जी ड्रिंक्स आणि पाकिटबंद पेयांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते.

-अल्कोहोल


अल्कोहोल आपल्या शरिराला काही प्रमाणात नुकसान पोहचवते. ते लिवरसाठी घातक असते. या व्यतिरिक्त अधिक अल्कोहोलचे सेवन केल्यास त्याचा रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. अशातच शरिराला इंन्फेक्शन विरोधात लढणे मुश्किल होते.

-तळलेले पदार्थ


तंदुरुस्त राहण्यासाठी तळलेल्या पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. या फूड्समुळे आपले वजन वाढते आणि ते आरोग्यासाठी घातक असते. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा कमजोर होते. अधिक अनहेल्दी फॅट्स यामध्ये असल्याने शरिरात इंन्फ्लेमेशन निर्माण करतात आणि यामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर त्याचा परिणाम होतो.

 


हेही वाचा: Aluminum foil मध्ये रॅप केलेले पदार्थ खाल्ल्याने होईल आरोग्याची हानी

- Advertisment -

Manini