कोणते ड्रायफ्रुट्स भिजवून खाल्ले पाहिजेत?

कोणते ड्रायफ्रुट्स भिजवून खाल्ले पाहिजेत?

हेल्दी स्नॅक्सच्या रुपात ड्राय फ्रुट्स नेहमी खाल्ले जातात. त्यामध्ये पोषक तत्त्व भरपूर प्रमाणात असतात आणि ते भूक लागल्यानंतर खाऊ शकतो. ड्राय फ्रुट्स एनर्जीचा खजिना मानला जातो. यामध्ये काही प्रकारचे माइक्रोन्युट्रीएंट्स आणि अँन्टीऑक्सिडेंट्स असतात. या व्यतिरिक्त लोह, फॉलेट, व्हिटॅमिन बी-12, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई सारखे ही काही माइक्रोन्युट्रेंट असतात जे शरिराला उर्जा देतात. जर तुम्ही सकाळच्या नाश्त्यात काही ड्राय फ्रुट्स खात असाल तर तुम्हाला दिवसभर उर्जेशीर वाटते. मात्र असे कोणते ड्राय फ्रुट्स आहेत जे भिजवून खाल्ले पाहिजेत याच बद्दल आपण जाणून घेऊयात.

-बदाम


तुम्हाला बदामाचे सेवन करायचे असेल तर कमीत कमी 6-8 तास भिजवून ठेवू शकता. यामध्ये असलेले सर्व पोषक तत्त्व तुम्हाला मिळतात. बदामात व्हिटॅमिन ई, अँन्टिऑक्सिडेंट्स आणि असेंशियल ऑइल युक्त असते. पाण्यात भिजवल्यानंतर त्यामधील फायटिक अॅसिड नष्ट होतात. हे हार्टच्या हेल्थसाठी फायदेशीर असतात.

-अक्रोड


अक्रोड सुद्धा पाण्यात भिजवले पाहिजेत. अक्रोडमध्ये काही प्रकारचे फॅटी अॅसिड, प्रोटीन आणि काही प्रकारचे मिनिरल्स असतात. वेट लॉससाठी अक्रोडचे सेवन करणे फायदेशीर असते.

-मनुके


मनुके मऊ जरी असले तरीही ते भिवजून खाल्ले पाहिजेत. मनुके हे गरम असतात. त्यामुळे ते भिजवून खाल्ले पाहिजेत. भिजवलेले मनुके पोटासाठी फायदेशीर असतात.

-अंजीर


अंजीर फार गरम असतात. मनुक्यांपेक्षा यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असतात. यामध्ये फॅट नसते आणि कार्बोहाइड्रेटचे प्रमाण ही संतुलित राहते. यामुळे हे कोलेस्ट्रॉलला कमी करण्यास मदत करतात. ड्राय फ्रुट्समध्ये अंजीर आरोग्यासाठी फायदेशीर असते. ते पाण्यात भिजवून खाल्ल्यास अधिक फायदा होतो. महिलांसंबंधित आजार आणि ब्लड शुगरला कंट्रोल करण्यास ही फायदेशीर असतात.

-खजूर


खजूर खरंतर चिकट असतात. त्यामुळे बहुतांश लोक असेच खातात आणि जर तुम्ही ते भिजवून खाल्ले किंवा दूधात भिजवून खाल्ल्यास अधिक फायदे मिळतात. खजूरमध्ये ऑर्गेनिक सल्फर असते. जे सीजन एनर्जी नष्ट
करतात. त्याचसोबत हे हार्ट डिजीज आणि नसांसंबंधित ही आजारांसाठी फायदेशीर असतात.


हेही वाचा- दूधात तूप मिक्स करुन प्यायल्याने होतात हे फायदे

First Published on: August 9, 2023 12:45 PM
Exit mobile version