Tuesday, April 30, 2024
घरमानिनीHealthदूधात तूप मिक्स करुन प्यायल्याने होतात हे फायदे

दूधात तूप मिक्स करुन प्यायल्याने होतात हे फायदे

Subscribe

दूधात तूप टाकून पिणे काही संस्कृतिपैंकी एक पारंपारिक प्रथा आहे. असे मानले जाते की, यामुळे काही आरोग्यदायी फायदे होतात. दुध आणि तूप मिक्स करुन प्यायल्याने आरोग्याला नक्की काय फायदे होतात हेच आपण आज पाहणार आहोत.(milk and ghee health benefits)

पौष्टिक तत्वांनी भरपूर
दूधात कॅल्शिअम, प्रोटीन, व्हिटॅमिन आणि खनिज सारखे आवश्यक पोषक तत्त्व असतात. तूपात हेल्दी वसा, वसामध्ये व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के आणि ब्युटिरिक अॅसिड असते. जे आतड्याच्या आरोग्यासाठी खुप प्रभावी असते.

- Advertisement -

पचन होण्यास मदत होते
जर तुम्ही दूधात एक चमचा तूप मिक्स केल्यास तर पचनक्रिया सुधारते. आयुर्वेदात तूपाला सात्विक भोजन मानले जाते. असे मानले जाते ककी, यामुळे पचन क्रिया सुधारते आणि दूधातून पोषक तत्त्वांपेक्षा उत्तम अवशोषण करण्यास मदत करते.

सांधेदुखीवर उत्तम
जर तुमच्या घरातील वयस्कर मंडळींचे सांधे दुखत असतील तर तुम्ही त्यांना दूधात तूप टाकून देऊ शकता. दूध कॅल्शिअमचे एक उत्तम स्रोत आहे. जे हाडांना आणि दातांना बळकटी देते. तूप मिक्स केल्याने व्हिटॅमिन डी मिळते.

- Advertisement -

ग्लोइंग स्किनसाठी
वाढत्या प्रदूषण आणि तणावामुळे नेहमीच त्वचा ड्राय होते. त्यावर डाग येतात. मात्र तूप आणि दूध मिक्स करुन प्यायल्यास स्किन ग्लो होण्यास मदत होते. तसेच एक्जिमा सारख्या त्वचेसंबंधित समस्यांसाठी सुद्धा फायदेशीर असते.

सर्दी-खोकल्यासाठी फायदेशीर
गरम दूधासह हळद आणि शुद्ध तूप टाकून प्यायल्यास सर्दी, खोकल्याची समस्या दूर होते. त्याचसोबत शिंका येणे, खोकला सुद्धा यामुळे कमी होतो. हळदीच्या दूधात अँन्टीवायरल आणि अँन्टीबॅक्टेरियल गुण असतात.


हेही वाचा- गोल्डन मिल्क म्हणजे काय ? काय आहे याचे विशेष महत्व

- Advertisment -

Manini