जपानी लोकांच्या सुदृढपणाचे हे आहे रहस्य

जपानी लोकांच्या सुदृढपणाचे हे आहे रहस्य

जपानी नागरिक त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी ओळखले जातात. यामागे त्यांची निरोगी जीवनशैली, स्वच्छतेची सवय आणि शरिरासाठी योग्य असे खाण्या-पिणे. जपानचे लोक मुख्यतः त्यांच्या अन्नामध्ये अशा गोष्टींचा समावेश करतात जे शरिरात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात, जसे कि आंबवलेले अन्न.
जपानचे लोक प्रत्येक अन्न आंबवून ते तयार करण्याचा प्रयत्न करतात. आंबवलेल पदार्थ ज्यात यीस्ट बनवून तयार केले जाते. या प्रकारचे अन्न बनवण्यासाठी वापरलेले साहित्य रात्रभर असेच ठेवले जाते.

या दरम्यान यीस्ट तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. किण्वन जीवाणू किंवा बुरशी सेंद्रीय संयुगे एसिडमध्ये रूपांतरित करतात. हे आम्ल एक नैसर्गिकरित्या बनवलेले अन्न असते, जे थोडे खाण्यासाठी आंबट लागते.
किण्वनरित्या बनवण्यात आलेले पदार्थ हे फायदेशीर असतात. जापनिस लोक पूर्वीपासून हेच पदार्थं खाण्यासाठी पसंत करतात.

कॉफी आणि चॉकलेटचे बीन्स आंबवून विविध पदार्थ बनवले जातात. या व्यतिरिक्त, किण्वित अन्न धान्य दळणे, पाश्चरायझिंग दूध आणि मांसाचे लहान तुकडे करून बनवले जाते. हे एक प्रकारचे प्रक्रिया केलेले अन्न आहे.
जपानी नागरिक दोन आठवड्या पर्यंत द्राक्ष भिजवून ठेवून त्याचा उपयोग वाइन बनवण्यासाठी करतात. जपान मधले प्रसिद्ध अन्न सुशी आणि फनाझुशी बनवण्यासाठी तांदूळ दोन-तीन वर्षांसाठी आंबवले जाते.
कॅन्सस विद्यापीठातील जपानी इतिहासाचे प्राध्यापक ‘एरिक रथट’ यांनी डिस्कव्हर मॅगझीनला सांगितले, “आंबलेल्या अन्नाशिवाय पारंपारिक जपानी पाककृतीची कल्पना करणे अशक्य आहे.

जपानमध्ये किण्वन करण्याच्या या प्रक्रियेला ‘हक्का’ म्हणतात. ज्याचा उपयोग कोणताही अन्न निरोगी आणि चवदार करण्यासाठी केला जातो. एरिकने सांगितल्या प्रमाणे ‘सुकेमोनो(लोणचे), मिसो(किण्वन सोया बीन पेस्ट) किंवा सोया सॉस. जपामध्ये कोणत एखाद असे पदार्थ असेल जे किण्वन प्रक्रिेयेतून बनवले नसेल. जपानमध्ये प्रसिद्ध पदार्थ जसे नट्टो, कात्सुओबुशी आणि नुकाझुके विशेषत: अल्कोहोलिक ड्रिंक्स खाती आणि शोचू देखील किण्वनापासून बनवले जातात.

किण्वनपदार्थ सोडल्यास इकडचे लोक हेल्दी असण्याचे आणखी ही कारणं आहेत. संपूर्ण जगातमध्ये मधुमेह आणि हृदय विकाराचा आजार असलेले लोक आहेत. पण जपानमध्ये ही संख्या कमी पाहायला मिळते. हेच कारण आहे की भरपूर तांदूळ आणि कार्बोहायड्रेट्स खाऊनही येथील लोकांच वजनावर ताबा असतो.

First Published on: August 7, 2021 2:39 PM
Exit mobile version