या सोप्या उपायांनी पित्ताचा त्रास करा दूर

या सोप्या उपायांनी पित्ताचा त्रास करा दूर

आजच्या धावपळीच्या जीवनात शरीर निरोगी ठेवणे मोठे आव्हान आहे. असुंलित आहारामुळे अनेकांना पित्ताचा त्रास होतो. पित्तामुळे डोकं दुखणे, उलट्या होणे, छातीत जळजळ होणे, डोक्याला ठणके बसणे असे अनेक त्रास होतात. यामुळे सतत असह्य वाटू लागते. मात्र, यावर काही घरगुती उपाय केल्यास पित्ताचा त्रास दूर होतो.

पित्ताचा त्रास दूर करण्यासाठी

केळी

 

केळी हे पित्तावर एक रामबाण उपाय आहे. पिकलेले केळे खाल्ल्याने आराम मिळतो. केळ्यामधील पोटॅशियम विषहारक द्रव्य म्हणून काम करते. यामुळे पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते.

तुळस

तुळस ही औषधी वनस्पती असल्याने त्याचे अनेक फायदे आहेत. पित्त झालेल्या व्यक्तींने चार ते पाच तुळशीची पाने चावून खाल्ल्यास आराम मिळतो.

दूध

पित्त झालेल्या व्यक्तीने साखर न घातलेले थंडगार दूध प्यायल्याने फायदा होतो. दूध हे पित्तशामक असल्याने पित्त कमी होण्यास मदत होते. त्यामुळे पित्त झाल्यासारखे वाटल्यास दुधामध्ये साजूक तूप घालून ते दूध प्यायल्याने आराम मिळतो.

बडीशेप

बडीशेप देखील पित्तावर एक रामबाण उपाय आहे. बडीशेपमधील अँटी अल्सर घटक पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर करते. त्यासोबत बडीशेपमुळे पोटात थंडावा तयार होऊन जळजळ देखील कमी होण्यास मदत होते.

जिरं

 

जिऱ्याच्या सेवनामुळे शरीरातील गॅसचे विकार दूर होण्यास मदत होते. जिऱ्याच्या सेवनामुळे पचन सुधारते आणि पित्त देखील होत नाही.

 


हेही वाचा : 

First Published on: April 3, 2024 2:50 PM
Exit mobile version