चटपटीत भुट्ट्याची भजी

चटपटीत भुट्ट्याची भजी

सध्या पावसाचे दिवस सुरू असल्यामुळे आपल्या गरमागरम पदार्थ आणि चटपटीत पदार्थ खावेस वाटतात. त्यामुळे आपण भुट्टा खायला जास्त पसंती दाखवतो. सध्या ठिकठिकाणी भुट्ट्याची दुकाने जास्त दिसतं आहे. मसाला मका, मसाला चीज मका अशा वेगवेगळे प्रकारे मका खायला मिळतो. या व्यतिरिक्त आज आपण भुट्टयाची म्हणजेच मक्याची भजी कशी बनवतात हे पाहणार आहोत.

साहित्य

१ किलो गरम भुट्टे, दिड कप बेसन, शिमला मिरची १, बारीक चिरलेला १ कांदा, आले-हिरवी मिरची पेस्ट १ चमचा, चिमूटभर हिंग, बडीशेप १ चमचा, तेल आणि मीठ

कृती

सर्वप्रथम भुट्टे किसून घ्यावेत. त्यात बेसन, चिरलेल्या भाज्या, आले-मिरची पेस्ट, हींग, बडी शेप आणि चवीनुसार मीठ टाकून मिश्रण तयार करावे. त्यानंतर कढईत तेल गरम करावे. केलेल्या मिश्रणाची भजी तेलात टाकून तळून घ्यावी. मग त्यानंचर तळलेली भजी किचनपेपर वर काढा. ही भजी तुम्ही स़ॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करू शकता.

First Published on: July 27, 2019 6:00 AM
Exit mobile version