घरमहाराष्ट्रLok Sabha Election 2024 : ...तर भाजपामध्ये जाण्यासाठी मी मोकळा; एकनाथ खडसे...

Lok Sabha Election 2024 : …तर भाजपामध्ये जाण्यासाठी मी मोकळा; एकनाथ खडसे स्पष्टच बोलले

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र निवडणुकीला काही दिवस शिल्लक असतानाही इनकमिंग-आऊटगोईंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव भाजपाचे वरिष्ठ नेते आणि खासदार उन्मेष पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा देत आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे सुद्धा भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. कारण त्यांनी दिल्ली दौरा करून आल्यावर माध्यमांशी वक्तव्य करताना म्हटले की भाजपमध्ये जायचं असेल तर मला इतरांना विचारण्याची आवश्यकता नाही. (Lok Sabha Election 2024 then I am free to join BJP Eknath Khadse spoke clearly)

हेही वाचा – Loksabha Election 2024 : किरण सामंत यांच्या माघारीनंतर बंधू उदय म्हणतात…, आमचा दावा कायम

- Advertisement -

एकनाथ खडसे म्हणाले की, मी दिल्लीला गेलो होतो, पण माझ्या काही कामासाठी गेलो होतो. त्यामुळे माध्यमांमध्ये ज्या प्रकारच्या बातम्या येत आहेत, त्यात काही तथ्य नाही. तशा पद्धतीचा काही निर्णय घ्यायचा असेल, तर तो विचार करून घ्यायचा असतो. कार्यकर्त्यांशी, पक्षाशी आणि नेत्यांशी बोलून घ्यायचा असतो. त्यामुळे असा काही निर्णय घ्यायचा असेल तर मी स्वतः माध्यमांना त्यासंदर्भात माहिती देईन. परंतु सध्यातरी भाजपात परतण्याच्या हालचाली सुरू नसल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024: उद्धव ठाकरेंकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; कल्याणमधून वैशाली दरेकर मैदानात

- Advertisement -

भाजपामध्ये जायचं असेल तर कोणाला विचारण्याची आवश्यकता नाही (If you want to join BJP, you don’t need to ask anyone)

दिल्ली दौऱ्याबद्दल बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, दिल्लीमध्ये गेल्यानंतर अनेक नेत्यांशी भेटीगाठी होत असतात. मात्र माझ्या दिल्लीवारीत अशा कोणत्याही भेटी झाल्या नाहीत. परंतु भाजपामध्ये परतण्यासाठी मला कोणाच्या मार्फत प्रयत्न करण्याची गरज नाही. भाजपामध्ये जायचं असेल तर वरिष्ठ पातळीवर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी माझे उत्तम संबंध राहिले आहेत. आताही त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे भाजपामध्ये जायचं असेल तर मला इतरांना विचारण्याची आवश्यकता नाही, असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -