मेहंदी लगाके रखना…

मेहंदी लगाके रखना…

अरेबिक मेहंदी

प्रत्येक व्यक्तीला नटण्या मुरडण्याची आवड असते. कोणत्याही समारंभात जायच म्हटंल का? साजेसे कपडे, हेअर स्टाईल, दागिने यामुळे आपण हटके दिसतो. मात्र, आपण किती ही फॅशनेबल राहिलो. तरी देखील आपली मेहंदी काढण्याची क्रेझ काही कमी होत नाही. हातावर काढलेल्या मेंहदीने आपल्या सौंदर्यात अधिकच भर पडते. खास करुन श्रावणात मेहंदी अधिक प्रमाणात काढली जाते. श्रावणात बरेचसे सण येतात. या सणांच्यानिमित्तांने महिलांना वेध लागतात ते मेहंदी काढण्याचे. अशाच काहीशा झटपट काढता येणाऱ्या मेहंदी डिसाईन्स आपण पाहणार आहोत.

साधी मेहंदी

साधी मेहंदी ही हात भरुन काढली जाते. ही मेहंदी लग्न समारंभात महिला वर्ग आवर्जून काढतात. काही महिला ही मेहंदी काढताना मंगटापासून सुरुवात करतात. तर काहीवेळा ही मेहंदी काढताना अर्ध्या हातापासून सुरुवात केली जाते. ही मेहंदी काढण्यासाठी अधिक वेळ लागतो. ही मेहंदी तळहाताच्या मागच्या बाजूने देखील वेगवेगळ्या डिजाईन्सने काढली जाते. संपूर्ण हातावर काढलेली मेहंदी उठावदार आणि आकर्षित करणारी असते.

अरेबिक मेहंदी

अरेबिक मेहंदी ही झटपट काढता येणाऱ्या मेहंदीचा प्रकार आहे. ही मेहंदी साध्या मेहंदीच्या अगदी विरुद्ध काढली जाते. ही मेंहदी एका वेलीमध्ये काढण्यात येते. अरेबिक मेहंदी संपूर्ण हात भरुन काढली जात नसल्याने ही मेहंदी काढण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अरेबिक महंदी जशी तळहातावर काढली जाते तशीच ही मेहंदी तळहाताच्या मागच्या बाजूस काढली जाते. या मेहंदीमध्ये फुलांची डिझाईन्स छान दिसते.

स्टिकर मेहंदी

एखाद्या कार्यक्रमाला जायचे असल्यास आणि मेहंदी काढण्याचा मूड झाल्यास आपण सहज दोन मिनिटात आपल्या हातावर मेहंदी काढू शकतो. झटपट मेहंदीकरता स्टिकर मेहंदी हा एक उत्तम पर्याय आहे. या मेहंदीची खासियत म्हणजे या मेहंदीमध्ये विविध रंगाची मेहंदी आपण आपल्या हातावर उमटवू शकतो. तसेच ही मेहंदी दिसण्यास रंगीबेरंगी आणि आकर्षित असते.

ठसा मेहंदी

एखाद्या व्यक्तीला मेहंदी काढता येत नसेल अशा व्यक्तींना मार्केटमध्ये आपल्या आवडीनुसार मेहंदीची डिझाईन्स पाहून मेहंदीचा ठसा उमटवू शकतात. ही मेहंदी हातावर कोरली जात नाही तर या मेहंदीचा ठसा उमटवला जातो. या मेहंदीचा हाताच्या तळहातावर ठसा काढला जातो. या मेहंदीमध्ये साधी मेहंदीच्या सर्वात जास्त डिझाईन्स आढळून येतात. ही मेहंदी हातावर सुंदर आणि आकर्षित दिसते.

 

First Published on: September 2, 2018 6:33 PM
Exit mobile version