कच्चे केळे खा आणि तंदुरस्त राहा!

कच्चे केळे खा आणि तंदुरस्त राहा!

कच्चे केळे खा आणि तंदुरस्त राहा!

बाराही महिने बाजारात सहज उपलब्ध होणारे फळ म्हणजे केळ. अनेकदा बऱ्याच व्यक्ती कच्चे केळ असल्याने ते विक्रेत्याकडून विकत न घेता पिकलेले केळ आहे का? अशी विचारणा करतात. मात्र पिकलेल्या केळ्यापेक्षाही कच्चे केळे खाणे हे शरिरासाठी आरोग्यदायी असते.

वजन कमी करा

कच्च्या केळ्यामध्ये असलेल्या फायबर्समुळे शरिरातील अनावश्यक फॅट सेल्स काढून टाकायला मदत होते. त्यामुळे दररोज एक कच्चे केळ सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

भूक नियंत्रणात येते

कच्च्या केळ्यांमधील फायबर, इतर पोषण गुणांमुळे भुकावर ताबा मिळवता येतो. यामुळे कच्ची केळी खाल्ल्यामुळे लागणारी भूक नियंत्रणात येते.

पचनक्रिया सुधारते

कच्ची केळी खाल्ल्यामुळे पचन क्रिया चांगली राहण्यास मदत होते.

बद्धकोष्ठतेच्या समस्येवर उपाय

कच्च्या केळ्यामध्ये असलेल्या फायबर आणि स्टार्चमुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते.

मधुमेहावर नियंत्रण

तुमचा मधुमेह पहिल्या स्टेजमध्ये असेल तर कच्ची केळी खायला सुरुवात करा. कच्च्या केळ्यामुळे मधुमेह नियंत्रण राहण्यास मदत होते.

कॅन्सरचा धोकाही कमी होतो

कच्च्या केळ्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.

हाडे मजबुत होतात

कच्च्या केळ्यामध्ये कॅल्शिअम असल्यामुळे हाडे मजबुत होण्यास मदत होते.

First Published on: April 16, 2019 3:41 PM
Exit mobile version