Tuesday, April 30, 2024
घरमानिनीBeautyकोरफडीच्या या फेसपॅकने खुलवा तुमचे सौंदर्य

कोरफडीच्या या फेसपॅकने खुलवा तुमचे सौंदर्य

Subscribe

आयुर्वेदात कोरफडीला खूप महत्वाचे स्थान प्राप्त आहे. यामध्ये अनेक आयुर्वेदीक गुणधर्म असतात. कोरफडीमुळे केस, त्वचेसंबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. तुम्ही घरच्या घरी कोरफडीसोबत इतर गोष्टींची वापर करत तुमचे सौंदर्य खुलवू शकता.

कोरफडीच्या मदतीने खुलवा सौंदर्य

Aloe vera gel in beauty: a natural and moisturizing product

- Advertisement -
  • कोरफड आणि बदाम तेल

बदामाचे तेल त्वचा आणि आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. इतकेच नाही तर कोरफडीला त्वचेचे डाग दूर करण्यासाठी देखील एक चांगला उपाय मानला गेला आहे. बदामाच्या तेलाच्या तीन ते चार थेंबमध्ये एक चमचा कोरफड जेल टाका. यानंतर, हे मिश्रण चांगले मिसळा. आता ही पेस्ट प्रभावित भागावर लावा आणि थोडा वेळ ठेवा. काही वेळाने सामान्य पाण्याने धुवा.

  • कोरफड आणि ऍपल सायडर व्हिनेगर

ऍपल सायडर व्हिनेगरमध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात, जे मुरुमांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहेत. हा पॅक बनवण्यासाठी एक चमचा कोरफडीचा रस एक चमचा ऍपल सायडर व्हिनेगर आणि एक चमचा पाणी मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर टोनर म्हणून लावा. हा उपाय काही दिवस वापरल्यानंतर तुम्हाला फरक दिसेल.

- Advertisement -
  • कोरफड आणि लिंबू

या पॅक बनवण्यासाठी आधी एका भांड्यात अर्धा चमचा लिंबाचा रसा घ्या आणि त्यात दोन चमचे कोरफडीचा गर मिसळा. यानंतर ते प्रभावित भागावर लावा. सुकल्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा आणि नंतर त्यावर सनस्क्रीन वापरा. कोरफड आणि लिंबू दोन्ही त्वचेसाठी उत्तम काम करतात.


हेही वाचा :

पिंपल्सपासून सुटका हवी? या रसाचा करा वापर

- Advertisment -

Manini