Friday, May 10, 2024
घरमानिनीFashionJewellery collectionTips - तुमच्या ज्वेलरी बॉक्समध्ये हे दागिने हवेच

Jewellery collectionTips – तुमच्या ज्वेलरी बॉक्समध्ये हे दागिने हवेच

Subscribe

ज्वेलरी हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. यामुळे सणासुदीलाच नाही तर छोट्या मोठ्या कार्यक्रमातही महिला एखादा दागिणा घालतातच. पण जर तुम्हांला कोणत्या आऊटफिटवर कोणती ज्वेलरी शोभून दिसेल हे माहित नसेल तर तुमचा लूक बिघडतो. यामुळे आज आपण अशा ज्वेलरी कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत ज्या तुमच्या ज्वेलरी बॉक्समध्ये असायलाच हव्यात. कारण या ज्वेलरी ज्या पेहरावावर खुलून दिसतात ते पेहराव आपल्याकडे असतातचं.

- Advertisement -

चोकर
चोकर हा असा दागिणा आहे जो फक्त पारंपरिक पेहरावावरच नाही तर वेस्टर्न ड्रेसेसवरही शोभून दिसतो. चोकर तुम्ही साडीवरही घालू शकता आणि मॅक्सी ड्रेसवरही. त्यातही फ्लोरल चोकर नेकपीस हा वेस्टर्न आणि पारंपारिक पेहरावर शोभून दिसतो.

- Advertisement -

कुंदन

कुंदन ज्वेलरी रॉयल लूक तर देते. त्यातही जर ती गोल्ड, सिल्वर किंवा मोत्यांच्या दागिन्यांमद्ये जडवलेली असेल तर घालणाऱ्याला अप्रतिम लूक मिळतो. त्यामुळे पार्टीमध्ये, किंवा मिटींगमध्येही तुम्ही हातात कुंदन असलेले ब्रास्लेट,इयर रिंग्ज घालू शकता. अगदी छोटासा हलका नेकलेसही वापरू शकता.

टेंपल ज्वेलरी
गेल्या काही वर्षांपासून टेंपल ज्वेलरीचा ट्रेंड आहे. कॉटन साडी असो की कुर्ता आणि जीन्स अशा सगळ्याच आऊटफिटवर टेंपल ज्वेलरी शोभून दिसते. टेंपल ज्वेलरीमुळे ट्रेडीशनल आणि ट्रेंडी लूक मिळतो. त्यातही यातील लक्ष्मी मूर्तीची गळ्यातलं लटकन लक्ष वेधून घेते.

ब्रेसलेट
ज्वेलरीमध्ये नेकलेस, हार महत्वाचा तसेच महत्वाच्या आहेत बांगड्या आणि ब्रेसलेट. कारण त्यामुळे महिलांचा शृंगार पूर्ण होतो. हाताचे सौंदर्य तर वाढते. यासाठी बाजारात वेगवेगळ्या स्टाईलचे ब्रेसलेटही उपलब्ध आहेत. जे पारंपारिक आणि वेस्टर्न आऊटफिटवरही छान दिसतात.

या चार ज्वेलरीही तुमचा लूक बदलून टाकतात. यामुळे अनावश्यक हेवी ज्वेलरी न जमवता जी रोज तुम्ही वापरू शकता अशा लाईट वेट ज्वेलरी तुमच्याकडे असायलाच हव्यात.

- Advertisment -

Manini