Saturday, April 27, 2024
घरमानिनीBeautyउन्हाळ्यात त्वचेला कूलिंग इफेक्ट देण्यासाठी वापरा एवोकॅडो फेसपॅक

उन्हाळ्यात त्वचेला कूलिंग इफेक्ट देण्यासाठी वापरा एवोकॅडो फेसपॅक

Subscribe

हवामान बदलले की चेहऱ्यावर अनेक बदल दिसू लागतात. कधी मुरुमांची समस्या, कधी चिकटपणा. अशा सर्व समस्या टाळण्यासाठी आणि त्वचेला कूलिंग इफेक्ट देण्यासाठी उन्हाळ्यात या हंगामी फळापासून फेस मास्क तयार करून त्वचेला हायड्रेट ठेवता येते. जेणेकरून त्वचेवर ग्लो येईल आणि त्वचाही खराब होणार नाही. त्वचा निरोगी आणि मॉइश्चरायझ ठेवण्यासाठी घरगुती पद्धतीने फेस मास्क तुम्ही ट्राय करू शकतात.

उन्हाळ्यात त्वचेला कूलिंग इफेक्ट देण्यासाठी फेसपॅक

How to Make an Avocado Face Mask

- Advertisement -

एवोकॅडो आणि मध

चेहरा सुंदर ठेवण्यासाठी एवोकॅडो हे एक उत्तम फळ आहे. या फळामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड देखील भरपूर असते. जीवनसत्त्वे ए, डी आणि ई या फळामध्ये आढळतात, जे त्वचेचे पोषण करण्याचे काम करतात. याशिवाय यामध्ये असलेले गुणधर्म त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यास मदत करतात. एवोकॅडो आणि मधाचा फेसमास्क चेहऱ्यावर लावल्याने चेहरा छान सुरक्षित राहतो. याशिवाय आपल्या त्वचेवरील डागही निघू लागतात.

- Advertisement -

असा लावा फेस मास्क

  • हा फेस पॅक लावण्यासाठी सामान्य पाण्याने किंवा गुलाब पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
  • त्यानंतर एवोकॅडोचे बिया काढून दोन चमचे लगदा मॅश करा.
  • मॅश करताना गुठळ्या राहू नयेत हे लक्षात ठेवा. मग त्यात एक चमचा मध टाका. हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा.
  • आता 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या आणि नंतर पाण्याने धुवा.
  • उन्हाळ्यात होणारा चिकटपणा दूर करण्यासाठी हे फेसपॅक खूप फायदेशीर आहेत.

हेही वाचा :

Beauty Tips : उन्हाळ्यात त्वचा फ्रेश ठेवण्यासाठी घरीच बनवा ‘फेस स्प्रे’

- Advertisment -

Manini