Sunday, February 18, 2024
घरमानिनीBeautyकेस काळे करण्यासाठी करा जास्वंदीच्या फुलांचा वापर

केस काळे करण्यासाठी करा जास्वंदीच्या फुलांचा वापर

Subscribe

केस पांढरे होण्याच्या समस्येला अलीकडे अनेकजण सामोरे जातात. तरुणांमध्ये देखील ही समस्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. केस पांढरे होण्यासाठी खराब पाणी, तणाव, अनियमित आहार, अपूर्ण झोप आणि इतर अनेक कारणं असतात. विशेष म्हणजे हे पांढरे केस लपवण्यासाठी छोट्यांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वचजण केसाला कलर करतात.

मात्र, केमिकल कलरशिवायही केस नैसर्गिकरित्या कलर करता येऊ शकतात. जास्वंदीची फूलं केसांना केवळ नैसर्गिक रंगच देत नाहीत, तर केस चमकदार होण्यासाठी देखील मदत करतात.

- Advertisement -

असा तयार करा कलर

Hibiscus Tea for a Healthy Heart

  • जास्वंदीच्या फुलांचा कलर बनवण्यासाठी एका भांड्यात 2 कप पाणी गरम करा.
  • गरम पाण्यात 1 कप जास्वंदीच्या फूलांच्या पाकळ्या टाका. 15-10 मिनिटांपर्यंत पाणी गरम करा.
  • त्यानंतर पाणी थंड करुन, गाळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरा.
  • स्प्रे बॉटलमधील कलर केसांना लावण्याआधी केस धुवून घ्या.
  • त्यानंतर कंगव्याच्या मदतीने कलर संपूर्ण केसांवर लावा. एक तासापर्यंत हा कलर सुकू द्या.
  • त्यानंतर पाण्याने केस धुवा. केसांना नैसर्गिक कलर करण्यासाठी हा चांगला उपाय ठरु शकतो.

हेही वाचा :

प्लास्टीकचा कंगवा वापरावा की लाकडाचा?

- Advertisment -

Manini